Prostate cancer saam tv
लाईफस्टाईल

Prostate cancer कोणत्या पुरुषांना होतो, नेमका धोका काय? काळजी काय घ्याल?

Prostate cancer: गेल्या काही वर्षांपासून जगभरात या कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्याचप्रमाणे येत्या काळात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढणार असल्याचं अहवालात दिसून आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या जगभरात कॅन्सर ही गंभीर समस्या वाढताना दिसतेय. कॅन्सरमुळे अनेकांना आपण जीवही गमवावा लागतो. एकंदरीत पाहिलं तर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रोस्टेट ग्रंथी ही पुरुष प्रजनन प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असून ज्यावेळी या ग्रंथीमधील पेशी अनियंत्रितरित्या वाढतात तेव्हा हा कॅन्सर तयार होतो.

अहवालामधून काय समोर?

लॅन्सेट मेडिकल जर्नलच्या रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगभरात या कॅन्सरच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. या अहवालात म्हटल्याप्रमाणे, 2020 मध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या प्रकरणांची संख्या 14 लाख होती तर येत्या 2040 मध्ये ही संख्या वाढून 29 लाख इतकी होऊ शकते.

या अहवालानुसार, 2020 मध्ये प्रोस्टेट कॅन्सरमुळे 3 लाख 75 हजार पुरुषांचा मृत्यू झाला होता. तर पुरुषांमधील मृत्यूचं हे पाचवं प्रमुख कारण होतं. यानंतर आता 2040 पर्यंत या कॅन्सरने जीव गमावण्याची संख्या 85% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या कॅन्सरचा धोका कोणाला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

या कॅन्सरचा धोका कोणाला जास्त?

यासंदर्भात एसएल रहेजा हॉस्पिटल माहिमचे कंसल्टंट यूरोलॉजिस्ट डॉ. आनंद उत्तुरे यांनी सांगितलं की, प्रोस्टेट कर्करोगाचा धोका 65 वर्षांच्या वयानंतर वाढतो, परंतु तो लहान वयात देखील होऊ शकतो. लहान वयातील कॅन्सर हा अधिक धोकादायक असू शकतो. ज्या व्यक्तींचा वडील किंवा भाऊ या कॅन्सरने ग्रस्त होते त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

जर एखाद्याला प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणं जाणवत असतील तर त्यांनी यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. यूरोलॉजिस्ट रेक्टल फिंगर टेस्ट (DRE), ब्लड PSA टेस्ट, प्रोस्टेट MRI आणि बायोप्सी यांसारख्या काही सोप्या चाचण्यांद्वारे प्रोस्टेट कॅन्सरचं निदान करू शकतात. प्रोस्टेट कर्करोग गंभीर असू शकतो, परंतु त्याचं लवकर निदान होणं गरजेचं आहे. जर कॅन्सर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याआधीच लक्षात आला तर 97% रुग्ण पाच वर्षांपेक्षा जास्त जगू शकतात. प्रोस्टेट ही एक लहान ग्रंथी आहे, परंतु वेळेवर ओळख आणि योग्य उपचार निरोगी जीवन जगण्यात खूप मदत करतात.

भारतात कसं आहे या कॅन्सरचं प्रमाण?

भारतात प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणाऱ्या कॅन्सरमध्ये सर्वात सामान्य मानला जातो. आकडेवारी पाहिली तर याचं प्रमाण एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी ३% आहे. दरवर्षी अंदाजे ३३ हजार ते ४२ हजार या कॅन्सरच्या रूग्णांची नोंद होते. अहवालानुसार, जवळपास गेल्या २५ वर्षांमध्ये शहरी भागात प्रोस्टेट कॅन्सरची संख्या ही ८५ टक्क्यांनी वाढली असल्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे.

न्यूबर्ग लॅबोरेटरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी सांगितलं की, दीर्घायुष्यासाठी प्रोस्टेट कॅन्सरचं लवकर निदान होणं महत्त्वाचं आहे. नियमित तपासणी, जसं की, PSA चाचणी आणि डिजिटल रेक्टल टेस्ट हे निदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या पुरुषांच्या घरात या कॅन्सरचा इतिहास आहे त्यांनी वेळेवर निदान करयासाठी नियमित तपासणीला प्राधान्य दिलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT