Heat Bag Or Ice Cube : आपल्याला मुकामार किंवा एखादी दुखापत झाल्यास, बरेच लोक बर्फाने किंवा गरम पाण्याने शेकण्याचा सल्ला देतात. आपण क्रिकेट खेळताना देखील बरेचदा पाहिले असेल जखमी झालेलेल्या खेळाडूच्या दुखापत झालेल्या अवयवाला त्वरीत आरामासाठी बर्फाच्या बॅगने शेकतो. पण असे करणे योग्य आहे का?
दुखापतीपासून आराम मिळावा यासाठी कोणत्या परिस्थितीत बर्फ (Ice) आणि कोणत्या परिस्थितीत गरम पाण्याने शेकावे? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल, यावर तज्ज्ञांचे काय मत आहे सविस्तर जाणून घेऊयात.
स्नायूंमध्ये दुखापत असल्यास बऱ्याचदा लोक बर्फाने शेकतात आणि फरक पडला नाही की लगेच गरम पाण्याने शेकतात. तज्ज्ञांच्या मते असे करणे फार चुकीचे आहे. दोन्ही पद्धती एकत्र वापरल्याने हे उपायकारक नाही तर, हानिकारक ठरू शकते.
ऑरलँड हेल्थच्या एका अहवालानुसार, तुमची दुखापत कोणत्या प्रकारची आहे त्यावर त्याच्या उपचाराची पद्धत अवलंबून असते. जर जखम अधिक जुनी असेल, उदा. तुमच्या गुडघा किंवा कोपराची दुखापत जी हळूहळू वाढत गेली असेल व आता त्रास देत असेल, तर अशा वेळी बर्फाच्या पाण्याने शेकणे हानिकारक (Harmful) ठरू शकते. त्यामुळे जडपणा वाढतो आणि तुमचा त्रास वाढू शकतो. म्हणूनच जून्या दुखापतीला चुकूनही बर्फाने शेकू नये.
1. दुखापतीवर बर्फ कशाप्रकारे काम करते?
तज्ज्ञांच्यामते, जर जखम नवीन असेल तर अशा परिस्थितीत 48 तासांच्या आत बर्फाने शेकल्यास ते प्रभावी ठरू शकते. कारण बर्फ खराब झालेल्या रक्तवाहिन्या वाढण्यापासून रोखण्यास मदत करतो. ज्यामुळे सूज कमी होते, दुखापत झालेल्या अवयवांवरील लालसरपणा देखील निघून जातो आणि दुखण्यापासूनही आराम मिळतो.
जर जूनी दुखापत ताबडतोब उद्भवली असेल तर तिथेही बर्फ लावता येतो, पण तीव्र वेदना होत असतील तरच असे करता येते ही गोष्ट लक्षात ठेवावी. जर जखमेतून रक्त येत असेल तर नक्कीच बर्फाने शेकले पाहिजे. पण असे करताना बर्फ कधीही थेट जखमेवर ठेवू नये. एखाद्या टॉवेलमध्ये गुंडाळून तुम्ही बर्फाने शेकू शकता. बर्फाने 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ शेकले जाऊ नये याची काळजी घ्यावी. जर एखादा व्यक्ती हृदयरोगी असल्यास बर्फाचा वापर करू नये.
2. दुखापतीवर गरम पाण्याने शेकणे कशा प्रकारे काम करते?
जुन्या दुखापतीवर गरम पाण्याने शेकणे फायदेशीर ठरते. स्नायूंचा ताण, गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास यांसारख्या दुखापतींवर गरम पाण्याने शेक दिला जाऊ शकतो. कारण बर्फामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि गरम पाण्यामुळे रक्त वाहिन्या खुल्या होतात.
ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. ऑक्सिजनयुक्त रक्त त्या ठिकाणी वेळेत पोहोचते व वेदना कमी होण्यास मदत करते. सांधेदुखीवर हा एक अतिशय प्रभावी पर्याय आहे. जर शरीराच्या एखाद्या भागात वेदना होत असल्यास आणि जडपणा जाणवत असल्यास लगेच गरम पाण्याने शेकल्यास आराम मिळू शकतो. कंबरेखालच्या अवयवांच्या वेदनांवर गरम पाणी फादेशीर ठरते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.