Liver Damage Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Liver Damage Symptoms: लिव्हर खराब झाल्यावर शरीर तुम्हाला देतं हे 5 संकेत; शेवटचं लक्षणं जाणून व्हाल हैराण

Liver damage warning signs: यकृत हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयवांपैकी एक आहे. ते रक्त शुद्ध करते, पचनास मदत करते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. यामधील एक अवयव म्हणजे यकृत. तुम्हाला माहितीये का, तुम्ही खात असलेलं अन्न पचवण्याचं काम लिव्हर करत असतं. याचप्रमाणे लिव्हर इतर अनेक कामंही करतं. ते रक्त शुद्ध करतं, ऊर्जा साठवण्यास आणि प्रोटीन तयार करण्यास मदत करते.

मेटाबॉलिझ्म चांगलं ठेवण्यासाठी लिव्हर जबाबदार आहे. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर लिव्हरचं योग्य कार्य अत्यंत महत्वाचं आहे. जर लिव्हर योग्यरित्या काम करत नसेल किंवा खराब झालं तर शरीराची अनेक महत्वाच्या कामांमध्ये अडखळा येतो. अशावेळी लिव्हर आपल्याला काही संकेत देत असतो. या संकेतांडे दुर्लक्ष केलं तर लिव्हर पूर्णपणे खराब होऊ शकतं.

त्वचा पिवळी पडणं

जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर पिवळेपणा दिसला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे लिव्हर खराब झाल्याचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी यकृत योग्यरित्या काम करत नाही तेव्हा रक्तात बिलीरुबिन नावाचं द्रव जमा होतं. यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे होतात.

खाज येणं

लिव्हर खराब झाल्यावर तुमच्या त्वचेला खाज येण्याची समस्या जाणवते. ज्यावेळी लिव्हर खराब होतं तेव्हा शरीरात काही विषारी घटक जमा होऊ शकतात. हे घटक नसांमध्ये जमा होतात ज्यामुळे तुम्हाला खाज येण्याची तक्रार जाणवते.

पोटात सूज येणं

जर तुमचं लिव्हर खराब झालं असेल तर तुम्हाला तुमच्या पोटात सूज येण्याची समस्या जाणवते. यामध्ये पोटं फुगणं, पोटात जडपणा आणि बद्धकोष्ठता हे लिव्हर खराब झाल्याचे संकेत असू शकतात. जेव्हा तुमचं लिव्हर खराब होतं तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये दाब वाढतो आणि अल्ब्युमिनचं उत्पादन कमी होतं. परिणामी रक्तवाहिन्यांमध्ये द्रव जमा होतो ज्यामुळे पोटात ताण येतो. दीर्घकाळापर्यंत पोटात सूज राहिल्याने लिव्हर सिरोसिसचा धोका वाढतो.

सतत उल्टी होणं

जर तुमचं लिव्हर खराब झालं असेल तर तुम्हाला वारंवार उलट्या आणि मळमळीचा त्रास होऊ शकतो. ज्यावेळी यकृत खराब होतं तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ नीट फिल्टर होत नाहीत. याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. यामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, उलट्या, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं उद्भवू शकतात.

वजन कमी होणं

लिव्हर खराब झाल्यास तुमचं वजन सतत कमी होऊ शकतं. काहीही खाल्ल्यानंतर लिव्हर पोषक तत्वं शोषून घेतं. मात्र ते खराब झाल्यावर शरीर पोषक तत्वं शोषू शकत नाही. अशावेळी भूक न लागणं आणि यकृताला सूज येणं देखील होतं. त्यामुळे वजनातही घट होऊ लागते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Attack : मोकाट कुत्र्यांच्या झुंडीचा कहर, मुलीला ओढत नेलं अन् अंगाचे तोडले लचके, ४ वर्षांच्या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू

Maharashtra Live News Update: चिखलदऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार..

Mumbai News : मुंबईत धावत्या बसने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली, पहा VIDEO

CM Devendra Fadnavis: राज्यात १५ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Mangalsutra Pendant Design: मंगळसूत्र पेंडंटचे ट्रेडिंग 5 पॅटर्न, साडी किंवा वेस्टर्न लूकवर उठून दिसतील

SCROLL FOR NEXT