Brain fluid accumulation symptoms saam tv
लाईफस्टाईल

Brain fluid accumulation: मेंदूमध्ये पाणी जमा झालं की सुरुवातीला शरीरात दिसतात ४ मोठे बदल; वेळीच तज्ज्ञांनी घ्या मदत

Brain fluid accumulation symptoms: हायड्रोसिफॅलस म्हणजे डोक्यात किंवा मेंदूत पाणी साठल्यास होणारा आजार. ही एक न्यूरोलॉजीकल कंडीशन असून याला जलशीर्ष म्हणतात. हे मेंदूच्या पाण्याचा (cerebrospinal fluid) योग्य प्रवाह न झाल्यामुळे होऊ शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

मेंदूसंदर्भातील कोणतीही परिस्थिती ही गंभीर मानली जाते. यामध्ये हाइड्रोसेफेलस (Hydrocephalus) ही एक गंभीर न्यूरोलॉजिकल कंडीशन आहे. ज्यामध्ये मेंदूमध्ये जास्त प्रमाणात द्रव म्हणजेच सेरेब्रल स्पाइनल फ्लुइड जमा होऊ लागतं. सोप्या भाषेत याला मेंदूमध्ये पाणी जमा होणं असंही म्हटलं जातं. हा द्रव मेंदूच्या आत वेंट्रिकल्स म्हणजेच पोकळ्या निर्माण करतो. ज्यामुळे मेंदूवर दबाव वाढू लागतो.

मेंदूच्या समस्या या खासकरून मोठ्या वयातील किंवा वयस्कर व्यक्तींमध्ये दिसून येतात. मात्र ही समस्या नवजात बाळापासून ते वृद्धापर्यंत कोणत्याही वयोगटातील कोणालाही होऊ शकते. अशा परिस्थितीत त्याची लक्षणं जाणून घेणं गरजेचं असतं. जर याची वेळेत लक्षणं ओखळली तर उपचार लवकर मिळण्यास मदत होते.

हायड्रोसेफलस म्हणजे नेमकं काय?

मेंदूतील द्रवपदार्थाचा (CSF) प्रवाह थांबतो किंवा जास्त प्रमाणात वाहू लागतो तेव्हा हायड्रोसेफलस होतो. हा द्रव मेंदू आणि पाठीच्या कण्याला संरक्षण देतो. ज्याची पातळी दुखापत, संसर्ग, ट्यूमर किंवा स्ट्रोकनंतर बिघडू शकते. कधीकधी ही समस्या जन्माच्या वेळी उद्भवण्याचाही धोका असतो.

मेंदूमध्ये पाणी भरण्याची लक्षणं

डोकेदुखी

जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सावध व्हा. कारण वारंवार आणि तीव्र डोकेदुखी, विशेषतः सकाळी, हे हायड्रोसेफलसचे प्रारंभिक लक्षण असू शकतं. मेंदूवर वाढत्या दाबामुळे ही वेदना होते.

मळमळ आणि उल्टी

जर तुम्हाला डोकेदुखीसोबत मळमळ आणि उलट्या जाणवत असतील तर हे देखील या समस्येचं लक्षण आहे. मेंदूतील द्रवपदार्थाचा दाब सामान्यपेक्षा जास्त असल्याचं हे लक्षण असू शकतं.

दृष्टी धुसर होणं

मेंदूवरील वाढत्या दाबामुळे डोळ्यांच्या नसांवर परिणाम होण्याचा धोका असतो. यावेळी ज्यामुळे अंधुक दृष्टी, दुहेरी दृष्टी किंवा डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये असामान्यता येऊ शकते. त्यामुळे हा त्रास होऊ शकतो.

चालण्यात बदल

एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. यावेळी रूग्णाला पाय जड वाटू लागणं किंवा संतुलन राखणं कठीण होऊ शकतं. हे लक्षण हायड्रोसेफलसचे लक्षण असू शकतं. हा त्रास खासकरून वृद्धांमध्ये दिसून येतो.

वेळीच उपचार का गरजेचे

शस्त्रक्रिया किंवा शंट सिस्टीमच्या मदतीने हायड्रोसेफलसवर वेळेवर उपचार करता येणं शक्य आहे. जर त्याची कोणतीही लक्षणं कायम राहिली तर ताबडतोब डॉक्टरांची मदत घेणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. या विलंबामुळे मेंदूचं कायमचं नुकसान होण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT