Risk for premature babies winter SAAM TV
लाईफस्टाईल

Premature babies care: थंडी वाढली की प्रीमॅच्युअर बाळासाठी धोका वाढतो; पालकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं

Risk for premature babies winter: हिवाळ्यातील थंडी ही अकाली जन्मलेल्या बाळांसाठी अधिक धोकादायक ठरते. अशा बाळांचे शरीर पूर्ण विकसित नसल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते आणि थंडीमुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

Surabhi Jayashree Jagdish

अकाली जन्मलेली बाळं ही सर्वसामान्य बाळांच्या तुलनेत अधिक नाजूक असतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. शिवाय त्यांचा शरीराचं तापमान नियंत्रित करण्याची क्षमता देखील कमीच असते. त्यामुळे हिवाळ्यात अशा बाळांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.

डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ, ॲलर्जिस्ट आणि स्तनपान तज्ञ डॉ बॉबी सदावर्ते यांनी सांगितलं की, हिवाळ्यात थंडीमुळे अकाली जन्मलेल्या बाळांना सर्दी, खोकला, न्यूमोनिया यांसारख्या श्वसनविकारांचा धोका असतो. यासोबतच शरीराचं तापमान कमी होणं यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाळाला योग्य उब मिळेल याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

केवळ प्रौढांनाच नाही तर अकाली जन्मलेल्या बाळांनाही हिवाळ्यात आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अकाली जन्मलेली बाळं ३७ आठवड्यांच्या गर्भधारणेपूर्वी जन्माला येतात आणि त्यांचे अवयव आणि रोगप्रतिकारक प्रणाली पूर्णपणे विकसित झालेली नसते. हिवाळ्यात, तापमानातील घट आणि संसर्गातील वाढ यामुळे या बाळांना अधिक धोका असतो. या बाळांना ॲलर्जी, त्वचेच्या समस्या आणि सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास यांसारख्या श्वसनविकारांचाही त्रास होऊ शकतो. हे नवीन पालकांसाठी चिंताजनक ठरु शकते.

अकाली जन्मलेल्या बाळांमधील हिवाळ्यातील सामान्य समस्या

  • हिवाळ्याच्या दिवसात अकाली जन्मलेल्या बाळांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ही बाळं खूप नाजूक असतात, कारण त्यांच्या शरीरावर चरबी कमी असते आणि त्वचा पातळ असते. त्यामुळे या बाळांना लवकर थंडी वाजते. अगदी थोडा वेळ थंड हवेत गेल्यासही त्यांच्या शरीराचं तापमान अचानक कमी होऊ शकतं.

  • थंड हवा अकाली बाळांच्या नाजूक श्वसनमार्गांना त्रास देऊ शकते. त्यामुळे ब्रॉन्किओलायटिस, सर्दी, फ्लू, न्यूमोनिया आणि रेस्पिरेटरी सिंशियल व्हायरस (RSV) यांसारख्या श्वसनविकारांचा धोका अधिक वाढतो. याशिवाय हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, त्वचेला भेगा पडू शकतात आणि त्यामुळे त्वचेच्या संसर्गाची शक्यता देखील वाढते.

कशी घ्याल बाळाची काळजी?

  • बाळाला संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला. मऊ सुती कपड्यांसोबत लोकरीची टोपी, मोजे आणि हातमोजे वापरा. मात्र, बाळाला गरजेपेक्षा जास्त उष्णता निर्माण करणाऱ्या कपड्यांचा वापर करणं टाळा.

  • कांगारू मदर केअर (आई आणि बाळाचा त्वचेचा थेट संपर्क) ही पद्धत बाळाच्या शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते आणि आई-बाळातील नातेसंबंध अधिक दृढ करते.

  • बाळाची खोली स्वच्छ आणि हवेशीर ठेवा. मात्र थंड हवा थेट बाळावर येणार नाही याची काळजी घ्यावी. किमान ३ महिने घरात पाहुण्यांची ये-जा टाळावी आणि अकाली बाळाला घराबाहेर, गर्दीच्या ठिकाणी नेणे शक्यतो टाळा.

  • डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळापत्रकानुसार, बाळाला दूध पाजावं. नियमित दूध पाजल्यामुळे बाळाचे शरीर गरम राहतं आणि वजन वाढण्यास मदत होते.

  • बाळाची त्वचा कोरडी होऊ नये म्हणून सौम्य मॉइश्चरायझरचा वापर करा.

  • जर बाळाला सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, दूध न पिणं किंवा अस्वस्थता अशी लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haldi Kumkum Rangoli Design: हळदी- कुंकूवासाठी काढा या 5 सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या

Reduce Electricity Bill : तुम्हालाही लाईट बील प्रमाणाच्या बाहेर येतय? कमी करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

Maharashtra Live News Update : राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात कोण होणार महापौर? चार महिला नेत्यांची नावे चर्चेत

Budget: ८.५ कोटी नागरिकांना खुशखबर! अटल पेन्शन योजनेची रक्कम वाढवणार? अर्थसंकल्पात निर्णय होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT