Tulsi Vivah saam tv
लाईफस्टाईल

Tulsi Vivah 2024: तुळशीचं लग्न कधी आहे? या दिवशी कशी केली जाते पुजा? पाहा मुहूर्त आणि महत्त्व

Tulsi Vivah 2024: तुलसी विवाह कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. अनेक वेळा तारखा आणि शुभ मुहूर्ताच्या गणनेमुळे हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे करण्यात येतात.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळी संपली आता सर्वजण तुळशीच्या लग्नाची वाट पाहतायत. या दिवसानंतर अनेक घरांमध्ये लग्नसराईला सुरुवात होते. देवऊठणी एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. वैदिक पंचांगानुसार, तुलसी विवाह कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. अनेक वेळा तारखा आणि शुभ मुहूर्ताच्या गणनेमुळे हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे करण्यात येतात.

शास्त्रानुसार कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता तुळशीचा विवाह झाला होता. त्या दिवसापासून या शुभ मुहूर्तावर तुळशी विवाह केला जातो. या दिवशी भगवान श्री हरी आणि तुळशी मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. यावर्षी तुलसी विवाह 13 नोव्हेंबर 2024 रोजी बुधवारी साजरा केला जाणार आहे.

तुळशीच्या विवाहाचा शुभ मुहूर्त

पंचांग नुसार, द्वादशी तिथी १२ नोव्हेंबरला दुपारी ४:०४ वाजता सुरू होणार आहे. याशिवाय आणि १३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १:०१ वाजता संपणार आहे.

कसं साजरं केलं जातं तुळशीचं लग्न?

सर्वप्रथम अंगणात किंवा पूजा घराच्या मध्यभागी तुळशीचे रोप ठेवा. तुळशीच्या भांड्यावर उसाचा मंडप सजवा.

लग्नाचं सर्व साहित्य तुळशीला अर्पण करून लाल ओढणी अर्पण करा. भगवान शाळीग्राम भांड्यात ठेवा.

भगवान शालिग्रामला तांदूळ अर्पण केला जात नाही, त्यांना तीळ अर्पण केले जातात.

दुधात भिजवलेली हळद भगवान शाळीग्राम आणि आई तुळशीला अर्पण करा. यानंतर पूजेच्या साहित्यासह भाज्या, मुळा, मनुका आणि आवळा अर्पण करा.

देवाची आरती करावी. तुळशीच्या भोवती प्रदक्षिणा घाला. प्रसादाचं वाटप करा.

तुळशीच्या लग्नाचं महत्त्व

असं मानलं जातं की, तुलसी विवाहाच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि माता तुळशीची पूजा विधीनुसार केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. त्याचप्रमाणे भगवान विष्णू प्रसन्न होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT