Deadline To Update Your Aadhaar Card For Free
Deadline To Update Your Aadhaar Card For Free Saam Tv
लाईफस्टाईल

Aadhaar Card Update: कधीपर्यंत करता येणार विनामूल्य आधार कार्डचे अपडेट? जाणून घ्या प्रक्रिया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Last Date To Update Aadhaar Card For Free:

आधार आणि पॅन कार्ड हे देशभरातील नागरिकांच्या ओळखीसाठी उपयोगी असलेलं कार्ड आहे. अनेक सरकारी आणि इतर कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आधार कार्ड आवश्यक झाले आहे. ज्याच्याकडे हे कागदपत्र नाही त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दम्यान अनेक लोकांच्या आधार कार्डमध्ये नाव, नंबर, फोटो इत्यादी अनेक प्रकारच्या दुरुस्त्या आहेत.

जर आधार कार्डमध्ये दुरुस्ती केली नाही तर आपले अनेक शासकीय कामे होत नाहीत. त्यामुळे आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे. परंतु आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेच शुल्क लागणार नाही. परंतु मोफत अपडेट करण्याची सुविधा बंद होणार आहे. १४ मार्चपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. जर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये नाव किंवा पत्ता ऑनलाइन अपडेट करत असेल तर तुम्हाला ५० रुपये द्यावे लागतील. तुम्ही तुमच्याशी संबंधित कोणतीही माहिती १४ मार्चपर्यंत मोफत अपडेट करू शकता.

आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • Update Aadhaar पर्यायावर क्लिक करा.

  • आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करा.

  • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा.

  • पत्ता पर्याय निवडा.

  • त्यानंतर Proceed to Update Aadhaar वर जा.

  • आता अपडेट केलेल्या पत्त्याशी संबंधित कागदपत्रे अपलोड करा.

  • यानंतर एक रिक्वेस्ट क्रमांक तयार होईल.

  • हा नंबर सेव्ह करा आणि नंतर काही दिवसांनी तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.

    तुम्ही तुमच्या आधार कार्डची स्थिती रिक्वेस्ट नंबरद्वारे देखील तपासू शकता.

  • आधारकार्डमध्ये अपडेट करायचे असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही अपडेट करू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT