How To Apply Moisturizer Saam Tv
लाईफस्टाईल

How To Apply Moisturizer : कधी आणि कशाप्रकारे मॉइश्चरायझरचा वापर करावा? जाणून घ्या

Moisturizer Tips : कोरड्या त्वचेची समस्या कॉमन झाली असून अनेक व्यक्ती मुलायम त्वचेसाठी बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझरचा वापर करतात.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips : थंडीच्या दिवसांमध्ये अनेक व्यक्तींना स्किन ड्रायनेस ही समस्या होत असते. कोरड्या त्वचेची समस्या कॉमन झाली असून अनेक व्यक्ती मुलायम त्वचेसाठी बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझरचा वापर करतात.

परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, कधीही आणि कसेही मॉइश्चरायझर लावले तर, त्वचेला हानी पोहोचू शकते. अशातच मॉइश्चरायझर लावताना होणाऱ्या काही चुकांपासून वाचायला हवे.

प्रत्येक व्यक्ती आपल्या त्वचेवर मॉइश्चरायझरचा वापर करत असते. परंतु अनेक व्यक्ती मॉइश्चरायझर लावण्याच्या योग्य पद्धतीपासून लांब आहेत. यामुळे पुढे जाऊन तुमच्या त्वचेवर अनेक प्रकारचे साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात.

चला तर मग जाणून घ्या मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत. आम्ही सांगितलेलं टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकाल.

1. फेसवॉशचा वापर करा :

मॉइश्चरायझर लावण्याआधी अनेक व्यक्ती फेस वॉश करत नाहीत. असं केल्याने चेहऱ्यावरील धूळ आणि माती मॉइश्चरायझर सोबत मिक्स होते. यामुळेच तुमच्या त्वचेवर स्किन इन्फेक्शन, खाज येणे आणि आग होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच चेहरा स्वच्छ (Clean) धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे सोयीचे ठरेल.

2. मॉश्चरायझर अप्लाय करण्याची टिप्स (Tips) :

मॉइश्चरायझर डायरेक्ट चेहऱ्याला लावून चेहरा (Skin) रगडण्यापासून वाचले पाहिजे. सोबतच मॉइश्चरायझर बोटांच्या सहाय्याने त्वचेवरती टॅप करा. त्याचबरोबर कपाळावर, गळ्यावर, नाकावर आणि हनुवटीवर मॉइश्चरायझरचे छोटे छोटे ड्रॉप्स लावा. त्याचबरोबर तुमची स्किन आँइली असेल तर, तुम्ही मॉइश्चरायझर अजिबात वापरू नका. असं केल्याने तुमच्या स्किनमधील एक्स्ट्रा ऑइल वाढू शकते.

How To Apply Moisturizer

3. इतर प्रॉडक्ट लावण्यापासून वाचा :

अनेक व्यक्ती मॉइश्चरायझर लावल्यानंतर मेकअप किंवा इतर ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर रिएक्शन दिसु लागते. म्हणून मॉइश्चरायझर लावल्यानंतर एक ते दोन मिनिटे स्किनमध्ये चांगलं मुरल्यानंतर तुम्ही दुसरे प्रॉडक्ट वापरू शकता.

4. मॉइश्चरायझरचे फायदे :

स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझरचा वापर त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेवरील बंद स्किन पॉर्स ओपन होतात. ज्यामुळे मुस आणि इतर त्वचेवरील समस्यांपासून आपण लांब राहतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात धक्कादायक प्रकार! गॅस सिलेंडरमधून निघालं 10 लिटर पाणी

SCROLL FOR NEXT