WhatsApp Saam Tv
लाईफस्टाईल

Tech News: सिमकार्ड घेताना 'ही' चूक करु नका; अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम वापरल्यास जाल तुरुंगात

खोट्या कागदपत्रांच्या आधारे मोबाईल सिम खरेदीकरुन व्हॉट्सअॅप, सिग्नल, टेलिग्राम यासारखे अॅप्स वापरल्यास तुम्ही मोठ्या संकटात अडकू शकता.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांची मोठी आहे. आपल्या ओळखीच्या लोकांशी कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअॅप (Whatsapp) सध्याच्या घडीला मोठं माध्यम आहे. मात्र खोट्या कागदपत्रांच्या आधारे मोबाईल सिम खरेदीकरुन व्हॉट्सअॅप, सिग्नल, टेलिग्राम यासारखे अॅप्स वापरल्यास तुम्ही मोठ्या संकटात अडकू शकता. ही बाब लक्षात आल्यास संबंधित व्यक्तीली एक वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंडही होऊ शकतो. (Tech News)

इंडियन टेलिकम्युनिकेश विधेयक 2022 च्या ड्राफ्टमध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. सरकार याद्वारे ऑनलाईन आयडेंडिटी फ्रॉडच्या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे.

विना वॉरंट अटकेची तरतूद

इकोनॉमिक्स टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या विधेयकाबाबत डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशनने म्हटलं की, यामुळे टेलिकॉम सर्व्हिसचा वापर करुन फसवणूक करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. त्यामुळे जिथे गरज आहे तिथे ओळखीचा पुरावा सादर करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. बिलमध्ये या गुन्ह्यात कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहे. म्हणजे पोलीस अशा गुन्ह्यांमध्ये आरोपीला विना वॉरंट अटक करु शकतात.

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत म्हटलं की, नवीन विधेयकामुळे अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा बसेल. तसेच KYC नियम देखील फसवणुकीच्या घटना कमी करण्यास मदत करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT