WhatsApp Voice Note Update Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Voice Status: भन्नाट फीचर्स ! आता फोटो, व्हिडीओच नाही तर Voice Note ही करता येणार शेअर...

कोमल दामुद्रे

WhatsApp New Update : WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवनवीन अपडेट आणत असते. WhatsApp चे जाळे हे जगभरात सर्वत्र पसरले आहे. या वर्षी WhatsApp ने युजर्ससाठी अनेक भन्नाट फीचर्स आणले आहे. ज्यामुळे लोकांना एकमेकांशी संवाद साधताना अधिक मजेशीर होईल.

इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने चॅनल्स हे नवीन फीचर (Feature) आणले आहे. या फीचरच्या (Feature) मदतीने आपण आता स्टेटसवर फोटो व्हिडीओसोबत आता Voice Note ही आपण शेअर करु शकतो. कसे ते जाणून घेऊया सविस्तर

1. वैशिष्टय

WhatsApp ने iOS वापरकर्त्यांसाठी व्हॉइस स्टेटस अपडेट आणले आहे. व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकर WABetaInfo नुसार, व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरच्या मदतीने iOS युजर्स आता व्हॉइस नोट रेकॉर्ड करून शेअर करू शकतील.

व्हॉइस नोट रेकॉर्ड करण्यासाठी, वापरकर्त्यांना स्टेटस टॅबवर जावे लागेल त्यानंतर पेन्सिल सारख्या चिन्हावर टॅप करा आणि नंतर रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी मायक्रोफोनला अधिक काळ धरुन ठेवा. व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्यासोबतच युजर्स ते स्टेटसमध्ये शेअरही करू शकतील.

या फीचरच्या मदतीने युजर्स ३० सेकंदांपर्यंत स्टेटस शेअर करू शकतील. वापरकर्त्यांना चॅटवर व्हॉईस स्टेटस शेअर करण्याची सुविधाही मिळेल.

2. WhatsApp वर शेअर करण्याची परवानगी

सध्या WhatsApp मध्ये फोटो, मेसेज व व्हिडीओ शेअर करण्याची परवानगी देण्यात आली होती परंतु, आता वॉइस मेसेज देखील शेअर करता येणार आहे. हा कंटेंट इतर स्टेटस सारखाच २४ तास अॅक्टिव्ह राहील. त्यानंतर तो आपोआप डिलीट होईल. २०१७ मध्ये WhatsApp ने पहिल्यांदा स्टेटस शेअर हा प्रकार केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT