WhatsApp New Feature Saam Tv
लाईफस्टाईल

आता WhatsApp Chat ला सुद्धा पिन करता येणार, इतर नवीन भन्नाट Features ही होणार लॉन्च

कोमल दामुद्रे

WhatsApp New Update :

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट आणत असते. अशातच या वर्षी WhatsApp मध्ये अनेक भन्नाट फीचर्स लॉन्च करण्यात आले आहे. WhatsApp चे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. यावरुन आपल्या एकमेकांशी सहज संवाद साधता येतो.

अशातच WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी विविध नवीन फीचर्स आणले आहे. लेटेस्ट अपडेटद्वारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने IOS युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स आणले. यामध्ये मेसेज पिन करणे, व्हिडीओ कॉल दरम्यान कनेक्शन हेल्थ फिचर आणि व्हॉइस मेसेजमध्ये व्ह्यू वन्स इ फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. WhatsApp चे नवीन फीचर्स

Wabetainfo च्या अहवालानुसार WhatsApp च्या लेटेस्ट अपडेमध्ये iOS वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स आणले आहे. यामध्ये Video Call Connection Health, Pin Messages आणि View Once असे फीचर्स लॉन्च केले आहे. हे युजर्सला कसे मदत करेल जाणून घेऊया.

2. Video Call Connection Health

या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर वापरकर्त्यांना व्हिडीओ कॉल दरम्यान याचे कनेक्शन तपासण्याची सुविधा मिळेल. यासाठी त्यांना व्हिडीओ (Video) कॉल दरम्यान फक्त टायटलवर अधिक वेळ प्रेस करावे लागेल. यानंतर तुम्हाला रिअल टाइम व्हिडीओ कॉलिटी कनेक्शनची माहिती मिळेल.

3. Pin Messages

WhatsApp आता ग्रुपमधील कोणताही मेसेज पिन करु शकतील. यापूर्वी हे फीचर चॅट पिन करण्यासाठी उपलब्ध राहाणार आहे. ज्यामध्ये वापरकर्ते महत्त्वाचे मेसेज चॅटच्या प्रोफाइलच्या टॉपवर पिन करुन ठेवू शकता. तसेच मॅसेज पिन केल्यानंतर सगळे युजर्स पाहू शकता.

4. View Once

सध्या WhatsApp आपल्या युजर्सना व्ह्यू वन्स फिचर देत आहे. याच्या माध्यमातून तुम्ही फोटो आणि व्हिडीओ पाहू शकता. पण नवीन अपडेनंतर तुम्हाला ऑडिओ आणि व्हॉइस मॅसेज पाठवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT