WhatsApp Web Without QR Code Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Web Without QR Code: लॅपटॉप, डेस्कटॉपवर QR कोड स्कॅनशिवाय WhatsApp लॉग-इन होणार, ऑप्शन बघाच!

Whatsapp on PC Without Phone & QR Code : व्हॉट्सअॅप हे आज सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया मेसेजिंग अॅप आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Login to WhatsApp web without scanning QR code: व्हॉट्सअॅप हे आज सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपचे लाखो वापरकर्ते आहेत. स्मार्टफोन असणारा जवळपास प्रत्येकजण व्हॉट्सअॅप वापरतो. यूजर्सच्या सोयीसाठी कंपनी वेळोवेळी नवीन फीचर्ससह नवीन अपडेट्स आणत असते.

आता लॅपटॉप (Laptop) किंवा डेस्कटॉपवर अॅप्लिकेशन वापरणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपने एक मोठे अपडेट दिले आहे. असे वापरकर्ते आता QR कोड स्कॅन न करताही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपवर लॉग इन करू शकतील.

याप्रमाणे लॉगिन करू शकतील

आता व्हॉट्सअॅप वापरकर्ते वेबवर व्हॉट्सअॅप अकाउंट सहज लॉग इन करू शकतात. वापरकर्ते आता फक्त त्यांच्या मोबाईल नंबरने त्यांच्या खात्यात लॉग इन करू शकतील. आता तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करून लॅपटॉपवरील क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही. मोबाईल नंबरने लॉगिन करण्यासाठी तुम्हाला वेबवर जाऊन मोबाईलने लॉगिन करण्याचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल (Mobile) नंबर भरावा लागेल.

मोबाईल नंबर टाकल्यानंतर, तुम्हाला एक OTP पाठवला जाईल, हा OTP तुमच्या मोबाईलवर टाकावा लागेल. ओटीपी भरल्यानंतर, तुम्ही व्हॉट्सअॅप वेबवर सहजपणे लॉग इन करू शकाल. सध्या काही निवडक युजर्सना ही सुविधा मिळाली आहे. कंपनीने अद्याप हे फीचर प्रत्येकासाठी आणलेले नाही.

या वापरकर्त्यांना फायदा होईल

व्हॉट्सअॅपच्या या अपडेटचा वापरकर्त्यांना अनेक प्रकारे फायदा (Benefits) होणार आहे. जर तुम्हाला व्हॉट्सअॅप पुन्हा पुन्हा उघडून स्कॅनिंगची लांबलचक प्रक्रिया नको असेल तर या फीचरच्या मदतीने तुम्ही सहज लॉग इन करू शकाल. ज्यांचा कॅमेरा खराब आहे आणि त्यामुळे QR कोड स्कॅन करण्यात अडचण येत आहे अशा लोकांसाठीही हे फीचर खूप उपयुक्त ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT