WhatsApp News, 5 Mistakes WhatsApp Account Banned  Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp News : या ५ चुकांमुळे होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बॅन, वेळीच थांबा

5 Mistakes WhatsApp Account Banned : एखादी छोटीशी चूक केल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अंकाउटही बॅन होऊ शकते. अनेकदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीचे उल्लंघन होते. त्यानंतर लगेच आपले व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन होते.

कोमल दामुद्रे

WhatsApp Account Ban :

मेटाचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपचा जगभरात कोट्यावधी लोक वापर करतात. ज्यामुळे आपल्याला अनेक लोकांशी कनेक्ट होता येते. व्हॉट्सअ‍ॅपचे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे.

एखादी छोटीशी चूक केल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) अंकाउटही बॅन होऊ शकते. अनेकदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीचे उल्लंघन होते. त्यानंतर लगेच आपले व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन (Account Ban) होते.

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रसिद्ध आहे. त्यामुळे कंपनी गोपनीयता आणि सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी करत नाही. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुम्ही सावधगिरीने त्याचा वापर करायला हवा. जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे खाते (Account) बॅन होऊ शकते.

1. या ५ चुकांमुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन होईल

  • तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरताना थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर जीबी व्हॉट्सअ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप प्लस आणि व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा यांसारख्या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

  • एखाद्या नंबरच्या माहितीसह व्हॉट्सअॅप अकाउंट तयार केल्यास कंपनी कारवाई करु शकते. अशा व्हॉट्सअ‍ॅप अंकाउट्सवर कायमस्वरुपी बंदी घातली जाऊ शकते.

  • जर तुम्ही सतत अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवत असाल तर तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. तुमच्या कॉन्टॅक्ट (Contact) लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवर वारंवार मेसेज पाठवल्यास व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन करणे आहे.

  • जर काही लोकांनी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट रिपोर्ट केले किंवा ब्लॉक केले असेल तर तुमचे खाते बंद होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप अशा खातींना बनावट आणि स्पॅम संदेश पसरवणारे समजते.

  • तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोणालाही बेकायदेशीर संदेश, अश्लील मेसेज किंवा धमकीचे संदेश पाठवल्यास तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. कंपनीच्या नियमांविरुद्ध तुम्ही काही चुकीचे केले तर नंबरही बॅन होऊ शकतो.

2. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन केल्यावर काय करावे?

जर तुम्हाला वाटत असेल की, व्हॉट्सअ‍ॅप ने तुमचे खाते चुकीच्या कारणांमुळे बॅन केले आहे तर ते सक्रिय करण्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट अ रिव्ह्यू पर्यायावर टॅप करावे लागेल. व्हॉट्सअ‍ॅप तुमची रिक्वेस्ट तपासून योग्य ती कारवाई करेल. त्यानंतर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते पुन्हा सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT