Tips for a Healthy Relationship : नशीब म्हणावं या पुरुषमंडळीचं की, अगं बाई अरेच्चा चित्रपटासारखं समस्त महिला वर्गांच यांना ऐकू येत नाही. नाहीतर देव जाणे यांनी काय केलं असतं. यांच्या मागेमागे करणारी त्यांची आई, बहिण, बायको किंवा मुलगीच असते. परंतु तिचा देखील त्यांना असंख्य त्रास होतो बुआ...
बायकांना व मुलींना खूप बोलण्याची सवय असते. असं म्हटलं जातं की, बोलणं हा आमचा जन्मसिद्ध हक्कचं आहे. परंतु, एका वेळेनंतर नेमकं काय बोलावे हा सुद्ध प्रश्न त्यांना पडतो. बायको किंवा घरातली कोणतीही स्त्री पुरुषांवर ओरडली की, त्यांची मांजर हमखास होते. त्यावर तुझंच बरोबर आहे माझंच चुकलं अशी री ओडणारे पुरुष मंडळी काही कमी नसतात.
त्यातील काही पुरुष तर विषय बदलण्यासाठी व तिला लाडीगोडी लावण्यासाठी तु खूप छान दिसते, तु अशीच रहा, चल शॉपिंगला जाऊ असे बरेच गोड गोड बोलून तिला दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात.
कारण साहाजिकच कोणत्याही स्त्रीला (Women) राग हा लवकर येतो पण शांत देखील ती लवकरच होते. परंतु, नुकतेच लग्न झालेल्या पुरुषमंडळींना किंवा नात्यात मुरलेल्या पुरुषाला आजही कळतं नाही की, तिचा राग कसा शांत करावा.
ती चिडली की, फक्त आपल्यावर तलावर उगारत नाही इतकचं... मुळात स्त्रीचा स्वभाव चंचल असतो. तिला शांत कधी राहाताच येतं नाही. कधी विचार केला का ? जर ती बोललीच नाही किंवा ती रागवलीच नाही तर... साऱ्या जगातल्या पुरुषांचे जीवन सुखद होईल असं वाटतं जरी असलं तरी ते चुक आहे. तिच्या सतत बडबडण्याने घराला (Home) घरपण येतं. नवऱ्याला एखादी गोष्ट सांगताना ती अनेकदा लांब लचक सांगत बसते पण तितकाच वेळ ती तुमच्या जवळ देखील असते ना !
काही पुरुषांना तिची ही असंख्य बडबड सहन होत नाही आणि मग नात्यात खटके उडू लागतात. अशावेळी बायकांची प्रचंड चिडचिड होते पण जर तिला राग आलाच आणि तो अनावर झाला तर नवऱ्याने फक्त तिला बघत शांत ऐकायचं. मग हळूहळू तिचा राग शांत होतो. बायकांनीही थोडं आपल्या नवऱ्यावर लक्ष दिलं पाहिजे त्यांना समजून घेतलं पाहिजे. तुम्ही बोलताना तो सर्व काही ऐकत असतो कारण त्याच्या जवळच व्यक्ती ही त्याची बायकोच (Wife) असते. त्याला इतकही सुनावू नये की, त्याचे अश्रू अनावर होतील
नको नको वाटणारी गोष्टी जास्तंच पुढं येऊ लागली की मग त्यांचा त्रास आपल्याला दिसतो. आपण बायकांना समजलं पाहिजे. त्यांनाही नवऱ्याच्या भावना कळल्या पाहिजेत. त्याचं ही कधी ऐकत जा.
एकतर पुरुष जास्त बोलत नसतो. तुम्ही रोजच त्यांच्या मागे लागू लागलात की कुणालाही त्रास होणारंच. किती ही शांत असला की मग तो चिडतोच.
पुरुषांनी बायकांना थोडं बाहेर घेऊन जायला हवं. ती जास्तंच काही तरी वेगळ बोलू लागली की मग हिला बाहेर फिरवण्याची तारीख आली म्हणून समजा. बायका ह्या नवऱ्यासमोरच (Husband) रिलॅक्स होतात. त्यांना खूप तुमच्याशी बोलावं वाटतं. आपण कामात असतो. त्यामुळे वेळ देऊ शकत नाही. मग ह्या दिवसभर घरात बोर होतात. नवऱ्यासारखं आई वडिलांकडे तिला मन मोकळेपणाने बोलता येत नाही. तिचं सतत कुणी तरी ऐकावं असं तिला वाटतं असतं.
पुरुषमंडळी थकून आल्यानंतर त्यांना तिचं बोलणं थोडसं त्रास दायक वाटू लागतं. त्यावेळी आपण पण थोडं सहन करा. कामावरून आल्यावर ती जास्तंच उदास नाराज वाटली की तिला एकट्यात बोलवा. थकलेले केस मागे सारून दोन सेकंदाची छानशी कपाळावर किस घ्या. हात खोलून तिला हग करा. त्यावेळी तिचा दिवसभराचा सगळा ताण क्षणात कमी होईल. दिवस भर प्लॅन केलेले सांगण्यासाठी तिच्या डोक्यात काहीच रहाणार नाही. मग ती आपल्यासोबत गोडंच वागणार. कधीही बायका मुलींना (Girl) त्रास म्हणून बघू नका. त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.