Sugar Level After Meal saam tv
लाईफस्टाईल

Sugar Level After Meal: जेवणानंतर ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे? कधी मानली जाते धोक्याची पातळी

Post Meal Blood Sugar Level: साखरेची पातळी वाढल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी आणि जेवणानंतर साखरेची पातळी बदलू शकते. अशावेळी जेवल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे हे जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

मधुमेह ही एक सामान्य समस्या आहे. सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना या समस्येचा सामना करवा लागतो. ही एक चयापचय प्रक्रिया असून ज्यावेळी रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा त्याला मधुमेह म्हणतात. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो.

मधुमेहात, शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करू शकत नाही. त्यामुळे साखरेची पातळी वाढते. मधुमेहामुळे हृदय, किडनी आणि डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. साखरेची पातळी वाढल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी आणि जेवणानंतर साखरेची पातळी बदलू शकते. अशावेळी जेवल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे हे जाणून घेऊया.

जेवणानंतर किती असली पाहिजे ब्लड शुगर?

जेवणानंतर २ तासांनी साखरेची पातळी तपासली जाते. डॉक्टर जेवणानंतर दोन तासांनी साखरेची पातळी तपासण्याची शिफारस करतात. जेवणानंतर २ तासांनी रक्तातील साखरेची पातळी १२० ते १४० mg/dL दरम्यान असावी. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी या मर्यादेत असेल तर ती व्यक्ती निरोगी असते.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, रक्तातील साखरेची पातळी जेवणानंतर २ तासांनी १८० mg/dL असली पाहिजे. जर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी यापेक्षा जास्त असेल तर ही स्थिती खूप गंभीर होऊ शकते.

खाल्ल्यानंतर ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी काय केलं पाहिजे?

  • गोड किंवा जास्त तळलेले पदार्थ खाणं टाळावं.

  • साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धान्यांचा आहारात समावेश करावा.

  • कार्बोहायड्रेट आणि अनहेल्दी फॅट्स टाळलं पाहिजे.

  • भाज्यांमध्ये फायबर असतं, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतं.

  • नियमितपणे योगा किंवा व्यायाम करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

Crime: मामाच्या घरून परतताना दिव्यांग तरुणीवर सामूहिक बलात्कार, बचावासाठी पळत राहिली पण...; घटनेपूर्वीचा CCTV व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT