Former PM Manmohan Singh Death saam tv
लाईफस्टाईल

What Is Respiratory Disease: डॉ. मनमोहन सिंग यांना त्रास असलेला रेस्पिरेटरी डिसीज नेमका काय? किती धोकादायक आहे ही समस्या?

Former PM Manmohan Singh Death: रेस्पिरेटरी डिसीजमुळे डॉ. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. मात्र ही कंडीशन नेमकी काय असते, यामुळे तुमच्या जीवाला किती धोका संभवतो हे जाणून घेऊया

Surabhi Jayashree Jagdish

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एज रिलेटेड मेडिकल कंडीशन होती. यावेळी त्यांनी शुद्ध हरपली. दीर्घकाळापासून डॉ. मनमोहन सिंग रेस्पिरेटरी डिसीजने ग्रस्त होते.

रेस्पिरेटरी डिसीजमुळे सिंग यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. मात्र ही कंडीशन नेमकी काय असते, यामुळे तुमच्या जीवाला किती धोका संभवतो हे जाणून घेऊया.

रेस्पिरेटरी डिसीज म्हणजे काय?

रेस्पिरेटरी डिसीजला मराठीमध्ये श्वसन रोग असं म्हटलं जातं. प्रामुख्याने ही समस्या फुफ्फुस आणि श्वसन प्रणालीच्या इतर भागांना प्रभावित करते. हा आजार संसर्ग, वायू प्रदूषण, धुम्रपान, सेकंड हँड स्मोकिंग, इनहेलिंग रेडॉन किंवा एस्बेस्टोस धुळीमुळे होऊ शकतो, असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.

श्वसनाच्या या समस्येमध्ये दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), पल्मोनरी फायब्रोसिस, न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचा कॅन्सर यांचा समावेश होतो. याला फुफ्फुसाचा विकार आणि फुफ्फुसाचा आजार असंही म्हटलं जातं.

श्वसनाची कोणती समस्या ठरते जीवघेणी?

WHO च्या मते, COPD म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हे जगभरातील मृत्यूचे चौथं प्रमुख कारण आहे. या समस्येमुळे 2021 मध्ये 3.5 दशलक्ष मृत्यू झाल्याची नोंद आहे. ७० वर्षांखालील लोकांमध्ये सीओपीडी मृत्यूंपैकी जवळपास ९०% मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. धूम्रपान हे या आजाराचे सर्वात मोठं कारण आहे.

याशिवाय WHO च्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये अंदाजे 262 दशलक्ष लोक दम्याने ग्रस्त होते. या कालावधीत एकूण 4,55,000 लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. इनहेलरच्या मदतीने तुम्ही या आजाराची लक्षणं नियंत्रित करू शकतात.

या समस्येपासून कसा कराल बचाव?

श्वसनाचे आजार टाळण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी उपायांचा अवलंब तुम्हाला करावा लागणार आहे. यामध्ये सर्वप्रथम धूम्रपान टाळा कारण ते फुफ्फुसांना गंभीरपणे नुकसान करतं. वायू प्रदूषण टाळण्यासाठी, मास्क घाला आणि घरामध्ये एअर प्युरिफायरचा वापर करा. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम आणि योगा करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT