अष्टांग योगातील यम म्हणजे काय व त्याचे प्रकार- भाग २ Saam Tv
लाईफस्टाईल

अष्टांग योगातील यम म्हणजे काय व त्याचे प्रकार- भाग २

आतापर्यंत झालेल्या लेखांमध्ये आपण योग म्हणजे काय? योगची प्राथमिक भूमिका काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आतापर्यंत झालेल्या लेखांमध्ये आपण योग म्हणजे काय? योगची प्राथमिक भूमिका काय? किंवा योग का करावा? यांची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे इतक्यावरच न थांबता आपण महर्षी पतंजलींच्या मूळ अष्टांग योगदर्शन शास्त्राचा आढावा घेण्यासही सुरुवात केली आहे. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगातील पहिल्या अंगाचं म्हणजेच ‘यम’ (Social Code of Conduct) याच्यातील अहिंसा, सत्य ही दोन महाव्रते समजून घेतली. त्यानंतर आता अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांची माहिती घेणार आहोत.

हे देखील पहा -

१. अस्तेय -
अस्तेय याचा सरळ अर्थ आहे चोरी न करणे. एखाद्याची वस्तू किंवा विचार त्याला न कळवता घेणे ही चोरी आहे. फक्त स्वतःपुरता उपभोगात्मक विचार करणे, कोणाचेही पैसे, अधिकार, स्वातंत्र्य, त्याच्या कामाचे श्रेय आपण घेतल्यास ती चोरीच आहे.

२. ब्रह्मचर्य -
योग साधण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे हे व्रत. सामान्यतः लैंगिक सुख वर्ज्य करण्याला ब्रह्मचर्य म्हणतात. पण पूर्ण विचार करता लक्षात येईल, की आपले मन आणि बुद्धी हे इंद्रियांद्वारा विषयाकडे धावतात, त्यामुळे वासनेला आवर हे इंद्रियांच्या नियमनाने होणार आहे. ब्रह्मचर्याचा व्यापक अर्थ आहे ‘ब्रह्म चिंतनात अखंड राहणे’. ब्रह्म (चैतन्य तत्त्व/आत्मतत्त्व) + चर्या (अनुसंधान). ब्रह्मचर्य हे मन स्थिर करण्याचे साधन आहे.

३. अपरिग्रह -
आपण जे मिळवतो ते आपल्या गरजेसाठी, ज्याच्यामुळे आपले पोषण, वर्धन, रक्षण होत असते. मात्र, आपण काही अनावश्यक गोष्टींचा संग्रहही करतो. वस्तूंचा विनाकारण संग्रह म्हणजे परिग्रह. कपाट उघडून किती टक्के कपडे व वस्तू गेल्या सहा महिन्यांत वापरल्या नाहीत, ते बघा! अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणे तो अपरिग्रह.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT