Know the best time to eat fruit, Benefits of fruits, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

फळे खाण्याची योग्य वेळ कोणती? झोपण्यापूर्वी की, जेवणाआधी?

फळे कोणत्या वेळी खावीत जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणांना रात्री जेवल्यानंतरही भूक लागते. अशावेळी आपल्याला काही चटपटीत पदार्थ खायची इच्छा होते.

हे देखील पहा -

रात्रीच्या वेळी भूक लागल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते. जर आपण डाएट वर असू तर आपण फळे खाण्यावर अधिक भर देण्याचा प्रयत्न करतो. फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात ज्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. आयुर्वेदानुसार सायंकाळनंतर फळे खाऊ नये असा सल्ला दिला जातो. तसेच रात्री फळे का खाऊ नये हे देखील सांगितले जाते.

१. फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि रात्रीच्या जेवणापूर्वी ते खाल्ल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढू शकतो. बऱ्याच लोकांना उच्च साखरेचा त्रास असल्यामुळे हा धोका परिणामी वाढतो. त्यासाठी झोपण्यापूर्वी फळे खाणे टाळायला हवे.डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

२. आपण योग्य वेळी फळे व भाज्याचे सेवन करायला हवे. भाज्यांमध्ये पूरक प्रमाणात प्रथिने आढळतात. आपण आहाराचे स्वरुप निश्चित नाही केले तर शरीराला नुकसान होते.

३. रात्रीच्या जेवणाच्या वेळी, झोपण्यापूर्वी फळांचे (Fruit) सेवन केल्याने आपल्या अधिक ऊर्जा मिळेल परंतु, आपल्याला झोप येणार नाही. सकाळच्या नाश्त्यामध्ये फळांचे सेवन करावे. यामुळे दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळेल.

४. फळांमध्ये सामान्यत: कमी कॅलरीज असतात त्यामुळे आपले वजन लवकर वाढत नाही. परंतु, झोपण्यापूर्वी आपण केळी (Banana) खाल्ली की, त्यात अतिरिक्त १०० कॅलरीज मिळतील व आपले वजन वाढू शकते.

५. फळे सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणादरम्यान खाल्ल्यास फायदा होतो. फळे दिवसभरात पचले जातात, ज्यामुळे शरीराला जास्तीत जास्त पोषक तत्वे, फायबर, जीवनसत्त्वे आणि साखर मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दरासाठी आक्रमक

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT