Heart Attack Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Heart attack: हार्ट अटॅकचं पहिलं लक्षण काय दिसून येतं? डॉक्टरांनी सांगितले संकेत

Early signs of heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर काही ना काही संकेत देत असतं. डॉक्टर सांगतात की, शरीर आधीच काही इशारे देत असतं. हे इशारे वेळेत ओळखले तर जीव वाचवता येतो.

Surabhi Jayashree Jagdish

आपलं हृदय हे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे, असं डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात. त्यामुळे आपण आपल्या हृदयाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मात्र असं असूनही हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूंची संख्या काही कमी नाही. इंडियन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, २०२० मध्ये ३० ते ६० वयोगटातील तब्बल १९,२३८ लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होत असल्याचं समोर आलं आहे. तर २०२१ मध्ये १८ ते ३० वयोगटातील २,५४१ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

एका इंग्रजी वेबसाईटला माहिती देताना HCG हॉस्पिटलचे वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिनेश राज यांनी सांगितलं की, हार्ट अटॅक म्हटलं की आपल्यासमोर छातीत तीव्र वेदना होणं इतकंच आपल्याला वाटतं. मात्र प्रत्यक्षात हार्ट अटॅक तसाच असतो असं नाही. याची सुरुवातीची लक्षणं फारच सौम्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, त्यामुळे या समस्येचं पहिलं लक्षण ओळखणं गरजेचं आहे. जितक्या लवकर तुम्ही लक्षणं ओळखाल तितकं तुमच्या हृदयाच्या स्नायूचं नुकसान कमी होतं.

पहिलं लक्षण कोणतं दिसून येतं

डॉ. दिनेश यांच्या सांगण्यानुसार, अनेक लोकांना छातीत अस्वस्थता जाणवू लागते. यामध्ये एखाद्या टोकदार वस्तूने छातीत टोचल्यासारखं वाटू लागतं. या वेदना कशा असतात ते पाहूयात.

  • छातीवर जड दाब आल्यासारखं वाटू लागणं

  • छातीच्या मध्यभागी दुखणं

  • काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकणारी वेदना.

  • वेदना सतत येऊन जात असेल

कार्डिओलॉजिस्ट सांगतात की, हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीतच त्रास होतो हा एक सामान्य गैरसमज आहे. खाली दिलेल्या भागांमध्ये कारण नसताना अस्वस्थता जाणवत असेल तर त्याकडे विशेष लक्ष द्या

  • डावा हात: हे एक प्रमुख लक्षण आहे, पण कधी कधी दोन्ही हातांमध्येही त्रास जाणवू शकतो.

  • जबडा आणि मान: अनेकदा दातदुखी किंवा घसा दुखतोय असं समजून दुर्लक्ष केलं जातं.

  • पाठ: विशेषतः खांद्यांच्या पाठीमागच्या मधल्या भागात त्रास जाणवतो.

सायलेंट लक्षणं कोणती

डॉ. दिनेश यांनी सांगितलंय की, महिला, वयोवृद्ध व्यक्ती आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ‘अटिपिकल’ म्हणजे नेहमीपेक्षा वेगळी लक्षणं अधिक दिसतात. या व्यक्तींमध्ये सुरुवातीची लक्षणं वेदना नसून खाली दिलेली लक्षणं असतात.

  • अचानक प्रचंड थकवा- काही हलचाल न करताही मॅरेथॉन धावलात अशी अवस्था होणं.

  • कुठलाही शारीरिक ताण नसताना श्वास घ्यायला त्रास होणं.

  • मळमळ किंवा थंड घाम येणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Iran-US War: अमेरिका- इराणची अणुब़ॉम्ब चाचणी? जग अणु युद्धाच्या छायेत?

इस्त्रायल आणि इराणमध्ये कोण आहे बलवान? इराणच्या व्हिडिओनं अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली| Video

लव्ह मॅरेजनंतर तातडीनं घटस्फोट; पुण्यातील महिलेने पतीला दिले 50 हजार

Iran vs Israel America War : इराण होणार बेचिराख? अमेरिकेनं उघडला तिसरा डोळा, VIDEO

SCROLL FOR NEXT