ChatGPT VS GPT 4 Saam Tv
लाईफस्टाईल

ChatGPT VS GPT 4 : ChatGPT आणि GPT 4 काय आहे दोघांमधला फरक? जाणून घ्या

ChatGPT And GPT 4 Difference : ओपन AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील संशोधन कंपनीने Chat GPT 4, Chat GPT ची नवीनतम आवृत्ती लॉन्च केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Difference Between ChatGPT And GPT 4 : ओपन AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील संशोधन कंपनीने Chat GPT 4, Chat GPT ची नवीनतम आवृत्ती लॉन्च केली आहे. ChatGPT ची नवीन आवृत्ती सध्याच्या आवृत्तीपेक्षा वेगवान, अचूक आणि अधिक विशिष्ट आहे. 

ChatGPT 4 ने अनेक उच्चस्तरीय परीक्षा (Exam) देखील उत्तीर्ण केल्या आहेत. या चॅटबॉटची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये इमेज क्वेरी देखील करू शकता. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला ChatGPT आणि ChatGPT 4 मध्ये काय फरक आहे ते सांगू.

ChatGPT हे ओपन एआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केले होते तर ChatGPT 4 कंपनीने 14 मार्च रोजी सादर केले होते. विद्यमान ChatGPT केवळ मजकूराद्वारे लोकांच्या (People) प्रश्नांची उत्तरे देते, तर नवीन ChatGPT 4 मल्टीमॉडल वैशिष्ट्यासह येते आणि तुम्ही त्यामध्ये प्रतिमा क्वेरी देखील करू शकता. म्हणजेच त्यात फोटो पेस्ट करून तुम्ही प्रश्नांची उत्तरे देऊ शकता.

दोघांमधील मुख्य फरक -

आत्तापर्यंत तुम्ही ChatGPT मध्ये पाहिले असेल की तुम्ही चॅटबॉटला फक्त मजकूराद्वारे प्रश्न आणि उत्तर देऊ शकता. पण आता ChatGPT 4 मध्ये तुम्ही इमेज क्वेरी देखील टाकू शकता. याचा अर्थ तुम्ही फोटोंद्वारे प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकाल. 

ChatGPT 3.5 मध्ये आत्तापर्यंत तुम्ही फक्त 3000 शब्दांपर्यंत क्वेरी करू शकता परंतु ChatGPT 4 मध्ये तुम्ही डॉक्युमेंट फाइल अपलोड करून 25,000 शब्दांपर्यंत क्वेरी करू शकता किंवा प्रश्नोत्तरे करू शकता.

ChatGPT 4 अधिक अचूक आहे आणि विद्यमान चॅटबॉट्सपेक्षा कमी चुका करते. आतापर्यंत अनेकदा ChatGPT 3.5 वरून लोकांना चुकीची उत्तरे दिली जायची पण नवीन आवृत्तीत असे होणार नाही. कंपनीने ते अधिक प्रगत आणि सुरक्षित केले आहे. 

चॅट GPT 3.5 ला फक्त इंग्रजी चांगले समजते परंतु नवीन GPT 4 हे बहुभाषिक आहे आणि ते 26 पेक्षा जास्त भाषा समजते. ChatGPT 4 मध्ये, लोक प्रश्नांची उत्तरे मूळ भाषेत अचूकपणे शोधण्यास सक्षम असतील. 

तुम्ही चॅट GPT 4 वापरू शकता का?

आम्ही तुम्हाला सांगतो, ओपन एआयने डुओलिंगो, स्ट्राइप आणि खान अकादमीसह GPT 4 समाकलित केले आहे. तथापि, ते अद्याप सर्वांसाठी विनामूल्य केले गेले नाही. जर तुम्ही चॅट जीपीटी प्लसचे सदस्य असाल तर तुम्ही ही नवीनतम आवृत्ती वापरू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

Monday Horoscope : नवीन जबाबदाऱ्या मिळतील! ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

SCROLL FOR NEXT