Refrigerator Placement saam tv
लाईफस्टाईल

Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

Fridge Direction as per Vastu: किचनमध्ये फ्रिज कोणत्या दिशेला ठेवावा, याबाबत वास्तुशास्त्रात काही मान्यता आहेत. दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि दक्षिण-पूर्व दिशांबाबत काय सांगितले जाते? फ्रिज आणि गॅस शेगडीमधील अंतर, फ्रिजची स्वच्छता आणि अन्नपदार्थ साठवण्याच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल प्रत्येक घरातील किचनमध्ये फ्रिज असतो. दूध, भाज्या, फळं आणि शिजवलेलं अन्न ताजं ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र किचनमध्ये फ्रिज नेमका कोणत्या दिशेला ठेवावा, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतो. वास्तुशास्त्रानुसार, घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्हीही किचनमध्ये फ्रिज ठेवण्यासाठी जागा शोधत असाल, तर काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

दक्षिण-पश्चिम दिशा

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये फ्रिज ठेवण्यासाठी दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम दिशा योग्य मानली जाते. फ्रिज आकाराने मोठा आणि वजनाने जड असतो. त्यामुळे तो या दिशांना ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुमच्या किचनमध्ये या दिशांना जागा नसेल तर दक्षिण-पूर्व दिशेलाही फ्रिज ठेवण्यासाठी पर्याय म्हणून निवडता येऊ शकतं.

दक्षिण-पूर्व दिशा

वास्तुशास्त्रात, दक्षिण-पूर्व दिशेला आग्नेय कोन असं म्हटलं जातं. या दिशेला इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठेवणं योग्य मानलं जातं. त्यामुळे किचनमध्ये फ्रिज ठेवण्यासाठी दक्षिण-पूर्व दिशेचाही विचार करता येतो. याशिवाय फ्रिज ठेवताना त्याचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडतो याकडेही लक्ष द्यावं, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.

ईशान्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार, उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला फ्रिज ठेवणं टाळावं. ही दिशा जलतत्त्वाशी संबंधित मानली जाते. या दिशेला जड वस्तू ठेवणं योग्य नसल्याचं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. त्यामुळे फ्रिज ठेवण्यासाठी जागा निवडताना ईशान्य दिशा टाळण्याचा सल्ला दिला जातो.

गॅस शेगडीपासून फ्रिज दूर ठेवा

किचनमध्ये फ्रिज ठेवताना तो गॅस शेगडीच्या अगदी जवळ ठेवू नये. फ्रिज आणि गॅस शेगडी यांच्यामध्ये पुरेशी जागा असणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार या दोन्हींच्या मध्ये किमान एक फूट अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय फ्रिजचा दरवाजा पूर्व किंवा दक्षिण दिशेला उघडेल, अशा प्रकारे तो ठेवावा, असंही सांगितलं जातं.

फ्रिजची स्वच्छता ठेवणंही महत्त्वाचं

फ्रिज कोणत्या दिशेला ठेवला आहे, यासोबतच त्याची स्वच्छता राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. फ्रिजमध्ये खराब झालेलं किंवा सडलेलं अन्न जास्त काळ ठेवू नये. वेळोवेळी फ्रिज स्वच्छ करावा आणि त्यातील खराब पदार्थ बाहेर काढावेत. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, फ्रिजमध्ये खराब अन्न साठवून ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : खुशखबर! दिवाळीपूर्वी सोने-चांदी झालं स्वस्त! ग्राहकांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Marathi Actress Prajakta : 'Gen Z च्या नावाखाली हि**, समलिंगी...'; अभिनेत्री प्राजक्तावर आक्षेपार्ह कमेंट, नेटकरी संतापले

Diwali Faral : ना तूप, ना तेल! तरीही चवीला स्वादिष्ट; दिवाळी फराळ बनवण्याची खास ट्रिक लगेच वाचा

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT