Stage 0 cancer symptoms saam tv
लाईफस्टाईल

Stage 0 cancer: कॅन्सरची 0 स्टेज म्हणजे काय? या स्टेजची शरीरात कोणती लक्षणं दिसून येते वाचा

Stage 0 cancer symptoms: कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे, पण त्याची सुरुवातीची अवस्था ओळखली गेल्यास उपचार सोपे होतात. स्टेज ० कॅन्सर याला कार्सिनोमा इन सिटू असेही म्हटले जाते.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरच्या विविध स्टेजेस असतात. मात्र अनेकांना कॅन्सरची झिरो स्टेज माहिती नाहीये. ज्याला वैद्यकीय भाषेत कार्सिनोमा इन सिटू (CIS) म्हणतात. हा कॅन्सर तयार होण्याचा सर्वात सुरुवातीचा टप्पा मानला जातो. या अवस्थेत असामान्य पेशी फक्त त्या टिश्यूंच्या थरात आढळतात ज्यामध्ये त्या प्रथम निर्माण झाल्या असतात.

हे टिश्यू अजून खोलवर पसरलेल्ले नसतात किंवा शरीराच्या इतर भागांपर्यंत पोहोचलेले नसतात. इन सिटू या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे “त्याच्या मूळ ठिकाणी,” म्हणजेच ही अवस्था नॉन-इनवेसिव्ह असते.

जरी कार्सिनोमा इन सिटूला तीव्र किंवा धोकादायक कॅन्सर मानलं जात नाही, तरीही त्याला प्री-कॅन्सरस स्थिती मानण्यात येतं. वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास या पेशी पुढे जाऊन कॅन्सरच्या पेशींमध्ये रूपांतरित होतात. लवकर निदान झाल्यास ही समस्या वाढण्यापासून रोखता येते.

स्टेज 0 कॅन्सर म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं तर, स्टेज 0 कॅन्सर तेव्हा होतो ज्यावेळी पेशींमध्ये बदल सुरू होतात. पण हे बदल त्यांच्या मूळ ठिकाणीच मर्यादित राहतात. या पेशी कॅन्सरसारख्या दिसतात, पण त्या अजून निरोगी ऊतींमध्ये पसरलेल्या नसतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ (NIH) च्या संशोधनानुसार कार्सिनोमा इन सिटूचे काही प्रकार आहेत:

  • अॅडेनोकार्सिनोमा इन सिटू – गर्भाशय, फुफ्फुसे किंवा पचनसंस्थेत दिसतो.

  • डक्टल कार्सिनोमा इन सिटू (DCIS) – स्तनाच्या दूधवाहिन्यांमध्ये आढळतो.

  • स्क्वॅमस सेल कार्सिनोमा इन सिटू – त्वचा, तोंड किंवा स्वरयंत्रावर परिणाम करतो.

संभाव्य लक्षणं काय दिसून येतात?

बहुतेक स्टेज 0 कॅन्सर सुरुवातीला सायलेंट असतात म्हणजेच त्यांची लक्षणे फारशी दिसत नाहीत. मात्र त्वचा किंवा तोंडासारख्या दिसणाऱ्या भागांमध्ये ते झाल्यास काही संकेत दिसू शकतात.

त्वचेतील बदल

त्वचेवरील कार्सिनोमा इन सिटू प्रामुख्याने सूर्यप्रकाश जास्त पडणाऱ्या भागांमध्ये दिसतो. जसं की, चेहरा, मान, हात.

  • खरखरीत किंवा लालसर डाग जे कायम राहतात.

  • चमकदार किंवा मोत्यासारखे डाग जे बरे होत नाहीत.

  • वारंवार सोलणे किंवा खपली येणे.

तोंडातील बदल

तोंडात कार्सिनोमा इन सिटू दिसल्यास:

  • पांढरे किंवा लालसर डाग जे घासल्यावरही जात नाहीत.

  • ओठ, जीभ किंवा हिरड्यांवर खरखरीत किंवा जाडसर भाग.

  • न समजणारी वेदना किंवा त्रास जो कमी होत नाही.

  • हे लक्षणे प्रामुख्याने धूम्रपान करणारे, तंबाखू चघळणारे किंवा जास्त मद्यपान करणाऱ्यांमध्ये दिसतात.

स्तनातील लक्षणे

डक्टल किंवा लोब्युलर कार्सिनोमा इन सिटू बहुतेक वेळा मॅमोग्राफीद्वारे आढळतो. कधी कधी छोटी गाठ किंवा स्तनाग्रातून स्त्राव दिसू शकतो.

गर्भाशयातील पेशींमध्ये बदल

गर्भाशयातील कार्सिनोमा इन सिटू (CIN) बहुतेक वेळा पॅप स्मिअर किंवा HPV तपासणीत आढळतो. यामध्ये लक्षणं दिसत नाहीत. पण उपचार न झाल्यास ते कॅन्सरमध्ये बदलू शकतात.

किडनीशी संबंधित लक्षणं

मूत्राशयातील सुरुवातीच्या कार्सिनोमा इन सिटूमुळे:

  • लघवीत रक्त येणं (हेमॅच्युरिया)

  • वारंवार लघवी लागणं किंवा जळजळ होणं

  • ही लक्षणे सौम्य असू शकतात किंवा इतर आजारांसारखी वाटू शकतात, त्यामुळे नियमित तपासणी महत्त्वाची आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यातील 25 जण दुबईमध्ये अडकले

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर हल्ला; तब्बल १०१ जण बेपत्ता, बचाव कार्य सुरू

मुख्यमंत्र्यांची वर्णी राज्यसभेवर? राज्याचे उपमुख्यमंत्री बदलणार; देशाच्या राजकारणाला हादरा

Thursday Horoscope: खर्च वाढेल, अपूर्ण कामं पू्र्ण होतील; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Accident: शिमगोत्सवादरम्यान भयंकर घडलं! कारखाली चिरडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू, अपघातावेळी खिडकीतून खाली पडला नंतर...

SCROLL FOR NEXT