मुंबई : आयकर, कॉर्पोरेट टॅक्स आणि जीएसटीबद्दल सगळ्यांना माहिती आहेच. पण पिंक टॅक्सबद्दल अनेकांना माहिती नसेल. हा कोणताही सरकारकडून लावलेला कर नाही. मात्र यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना (Women) हे जास्तीचे पैसे मोजावे लागतात. पिंक टॅक्सच्या माध्यमातून कंपन्या तुमच्याकडून जास्त पैसे कर कापून घेत आहेत याचा सर्वाधिक फटका थेट महिलांना बसत आहे.
पिंक टॅक्सच्या माध्यमातून सरासरी प्रोडक्ट्सच्या किमतीवर महिलांकडून 7 टक्के अधिक पैसे घेतले जातात. दुसरीकडे पर्सनल केअर प्रोडक्ट्सवर हा फरक 13 टक्के इतका येतो.
जेव्हा कोणताही प्रोडक्ट महिलांसाठी डिझाइन केले असतात त्यावर जास्त पैसे आकारले जातात. अनेकदा भारतातील महिलांना उत्पादनांच्या किमतीपेक्षा जास्त किंमत मोजावी आणि याची त्यांना कल्पनाही नसते.
असे अनेक प्रोडक्ट्स आहे जिथे महिला नकळत पुरुषांच्या तुलनेत जास्त पैसे देतात. जसं की पुरुषाच्या तुलनेत सलूनमध्ये महिलांकडून जास्तीचे पैसे आकारले जातात. असंच अनेक ठिकाणी होतं. बॉडी वॉश, साबण, क्रीम यासारखे महिलांचे पर्सनल केअर प्रोडक्ट्स पुरुषांच्या प्रोडक्टपेक्षा महाग असतात.
यामागचे कारण असे मानले जाते की स्त्रिया किमतीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असतात. त्यांना उत्पादने आणि त्याची किंमत आवडली तर ते कमी करण्याऐवजी त्या प्रमाणात खरेदी करतात. यामुळेच कंपन्या देखील महिलांकडून जास्त पैसे घेतात. ही आता कंपन्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.