No Cost EMI Saam TV
लाईफस्टाईल

No Cost EMI म्हणजे काय? कंपनीला कसा होतो फायदा?

एखादी महागडी गोष्ट जर एखाद्या गरीब, मध्यमवर्गीय व्यक्तीला घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी आताच्या काळात No Cost EMI हा पर्याय चांगला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मंडळी आताचं युग हे डिजीटल युग आहे. त्यामुळे आपल्या पैकी बरेच जण डिजीटल पेमेंट करत असतील. सध्या बाजारात एक शब्द अतीशय ट्रेंड होतोय तो म्हणजे NO COST EMI नेमकं ही संकल्पना आहे तरी काय? कंपन्यांना NO COST EMI द्यायला परवडतं तरी कसंकाय? त्यामागचं नेमकं गणीत काय आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

No Cost EMI म्हणजे काय?

एखादी महागडी गोष्ट जर एखाद्या गरीब, मध्यमवर्गीय व्यक्तीला घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी आताच्या काळात No Cost EMI हा पर्याय चांगला आहे. ग्राहकाला ठरावीक रक्कम एकदम भरता येत नसेल तर कंपनी त्याला Monthly instalment मध्ये पैसे भरण्याची सोय उपलब्ध करुन देते. तीही शुन्य व्याजदरात. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही १५ हजार रुपयांचा मोबाईल खरेदी केला तर कंपनी तुम्हाला तीन, सहा, एक वर्ष या प्रमाणे EMI भरायला सांगते. त्यावर कुठेलेही जास्त पैसे आकारले जात नाही. त्यामुळे तुम्ही पैसे कमी असतानाही गोष्टी EMI वरती खरेदी करु शकता.

कुठे कुठे वापरु शकता?

NO COST EMI तुम्ही काय काय खरेदी करताना वापरू शकता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मोबाईल, फ्रिज, TV त्याचबरोबर आता तुम्ही कपडे, बुट देखील EMI वरती खरेदी करु शकता. यामुळे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टीही आता माणूस खरेदी करु शकतो. बाजारात सध्या अनेक बँका no cost emi चा पर्याय ग्राहकांना देत आहेत. तुमच्याकडे संबंधीत बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही emi सेवेचा लाभ घेऊ शकता. आपल्या देशात तरुणा

कंपनीला याचा काय फायदा?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सर्व गोष्टींचा एखाद्या कंपनीला काय फायदा होत असेल. तर जाणून घेवूयात, कंपनी तुम्हाला NO COST EMI वरती एखादी वस्तू देताना त्यावर असलेले डिस्काऊंट काढून घेते आणि ती वस्तू जेवढ्या किंमतीमध्ये आहे तेवढ्याला तुम्हाला देते. उदाहारण द्यायचं झाले तर, समजा एका मोबाईलची किंमत १५ हजार रुपये आहे आणि त्यावर कंपनी तुम्हाला १० टक्के २० टक्के डिस्काऊंट देत असते. जर तुम्ही NO COST EMI हा पर्याय निवडला तर तुम्हाला तो डिस्काऊंट मिळत नाही आणि तुम्हाला आहे त्या किंमतीमध्ये मोबाईल खरेदी करावा लागतो.

असंही होतं...

बर्‍याच वेळा असंही म्हणतात की किरकोळ विक्रेते आधीच उत्पादनाच्या किमतीत व्याज आकारतात आणि नंतर तुम्हाला नवीन किंमतीवर NO COST EMI ची सुविधा मिळते. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही लॅपटॅप खरेदी करायला गेला तर कंपनी ५० हजार रुपयांच्या लॅपटॅपची किंमत अगोदरच ५५ हजार करुन ठेवते जेणेकरुन ग्राहकांना ५५ हजार रुपयांचा EMI भरावा लागतो, असाही एक फायदा कंपनीला होतो.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT