आसला कुठं 'नो बॉल' असतो व्हय! तोंड फुटता-फुटता राहिलं; पहा Video

गोलंदाजाने एक चेंडू असा काही फेकला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mitchell Starc
Mitchell StarcSaam TV
Published On

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात (AUS vs SL)ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 20 षटकात केवळ 121 धावा करू दिल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीदरम्यान मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) असे काही केले जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिचेल स्टार्क हा त्याच्या उत्कृष्ट यॉर्कर्ससाठी ओळखला जातो पण मंगळवारी डाव्या हाताच्या गोलंदाजाने एक चेंडू असा काही फेकला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिचेल स्टार्कच्या या चेंडूतून त्याचा सहकारी मॅथ्यू वेड थोडक्यात बचावला आहे.

खरंतर कॅनबेरामध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये मिचेल स्टार्क डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना त्याने बीमर चेंडु फेकला. जरी हा बीमर फलंदाजापासून दूर होता. पण हा चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात असलेला यष्टिरक्षक मॅथ्यू वेड मात्र थोडक्यात बचावला. 18व्या षटकात स्टार्क गोलंदाजी करत होता आणि श्रीलंकेचा कर्णधार शनाका त्याच्यासमोर होता.

स्टार्कने त्याच्याकडे हळू चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला पण चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या समोर, ऑफ-स्टंपच्या बाहेर पडला. मॅथ्यू वेडने डायव्हिंग करून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. यादरम्यान तो चेंडू वेडच्या हातातूनही निसटला आणि चेंडू सीमापार गेला. पंचांनी हा चेंडूला नो बॉल दिला आणि श्रीलंकेला फ्री हिट मिळाली. रिप्लेमध्ये असे दिसून आले की स्टार्कने बॉल हळू टाकण्याचा प्रयत्न केला होता, या दरम्यान चेंडू त्याच्या हातातून निसटला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com