Digital Eye Strain freepik
लाईफस्टाईल

Digital Eye Strain: डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे काय? स्क्रीनमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या ताणापासून बचावाचे सोपे उपाय

Eye Care Tips: आजकाल अनेक लोक जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवतात, ज्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डिजिटल डोळ्यांच्या ताणाबाबत माहिती आणि त्यापासून बचावाचे उपाय पाहूया.

Dhanshri Shintre

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅब्लेट हे आपल्या आयुष्यातील अत्यावश्यक भाग झाले आहेत. आधी मुलं जास्त बाहेर खेळत असत, पण आता त्यांचा वेळ स्क्रीनवर अधिक जातोय. मनोरंजन, शिक्षण, आणि कामासाठी स्क्रीन वापर वाढल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो, ज्याला डिजिटल आय स्ट्रेन किंवा संगणक व्हिजन सिंड्रोम म्हणतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आणि स्क्रीनचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

डिजिटल आय स्ट्रेन हा फक्त डोळ्यांचा सौम्य थकवा नाही, तर वाढती गंभीर समस्या आहे. यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, कोरडेपणा, अस्पष्ट दृष्टी आणि वारंवार डोकेदुखी होऊ शकते. या डिजिटल युगात डोळ्यांचे आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण डिजिटल आय स्ट्रेनचे कारण, त्याची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याच्या प्रभावी उपायांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

डिजिटल डोळ्यांचा ताण हा दीर्घकाळ कॉम्प्युटर, फोन किंवा टीव्ही सारख्या डिजिटल स्क्रीनचा वापर केल्यामुळे होणारा त्रास आहे. यामागचे प्रमुख कारणे म्हणजे स्क्रीनवरील निळा प्रकाश, डोळे कमी मिचकावणे, तसेच अनुकूल नसलेले अंतर आणि प्रकाशमान. या ताणामुळे डोळ्यांमध्ये अस्वस्थता आणि थकवा निर्माण होतो.

दररोज २-३ तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनवर घालवणाऱ्या ५० ते ९०% लोकांना डिजिटल डोळ्यांचा ताणाचा त्रास होतो. यात डोळ्यांत वेदना, कोरडेपणा, थकवा, अस्पष्ट दृष्टी आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसतात. निळा प्रकाश रेटिनाला हानी करतो आणि झोपेवर परिणाम करतो. कमी लुकलुकल्याने डोळे कोरडे होतात, तर खराब प्रकाश आणि चुकीचा स्क्रीन अंतर समस्या वाढवतात.

ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता

- दर २० मिनिटांनी २० सेकंद स्क्रीनपासून दूर पाहून २० फूट दूरच्या वस्तूंकडे पाहा, त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

- स्क्रीनकडे बघताना लोक कमी डोळे मिचकावतात, त्यामुळे डोळे कोरडे होतात; त्यामुळे सतत डोळे मिचकावे.

- स्क्रीनची ब्राइटनेस कमी करा आणि निळा प्रकाश कमी करणारे फिल्टर किंवा विशेष चष्मा वापरणे फायदेशीर ठरते.

- स्क्रीन डोळ्यांपासून २०-२४ इंच दूर आणि डोळ्यांच्या स्तरापेक्षा १०-१५ अंश खाली ठेवणे योग्य असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

SCROLL FOR NEXT