आजकाल प्रत्येकजण इंस्टाग्रामवर (Instagram) लाईक्स आणि व्ह्यूजसाठी मेहनत घेत आहे. प्रत्येकजण आपले इंस्टाग्राम रीलचे व्ह्युज आणि लाइक्स वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. इंस्टाग्रामवर लाईक्स आणि व्ह्यूज कसे वाढवायचं असं विचारलं तर, इन्स्टाग्रामवर सतत पोस्ट करा, कंटेंटवर काम करा अशी उत्तरं मिळतात. पण अनेकदा आपण कंटेंट कोणत्या वेळी पोस्ट करतो, यावर व्ह्युज आणि लाइक्स अवलंबून असतात. इंस्टाग्रामवर केवळ सतत किंवा चांगली सामग्री बनवून लाईक्स आणि व्ह्यूज मिळत नाहीत. यासाठी तुम्हाला योग्य वेळी योग्य कंटेंट पोस्ट करावा लागेल. (latest lifestyle news)
इंस्टाग्राम रील्समध्ये दर्जेदार कंटेट आणि सातत्य जितके महत्त्वाचे (Instagram Tips) आहे, तितकेच योग्य वेळी रील पोस्ट करणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही योग्य वेळी रील पोस्ट न केल्यास त्याचा परिणाम होतो. रील्सवर चांगले लाईक्स आणि व्ह्यूज मिळविण्यासाठी रील कोणत्या वेळी अपलोड करावे, ते आपण जाणून घेऊ या.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इंस्टाग्रामवर रील पोस्ट करण्यासाठी योग्य वेळ
इंस्टाग्रामच्या (Instagram) अल्गोरिदमनुसार, जेव्हा तुमचे फॉलोअर्स जास्त सक्रिय असतात, तेव्हा तुम्ही तुमच्या Instagram अकाउंटवर रील पोस्ट केले पाहिजेत. यासाठी तुमच्या Instagram च्या Insights/Professional Dashboard विभागात जा. येथे तुम्हाला सक्रिय वापरकर्त्यांची अचूक वेळ कळतो.
येथे तुम्हाला तुमच्या रील आणि पोस्टच्या पोहोच तपशीलांबद्दल देखील माहिती मिळेल. येथे तुम्हाला कोणती रील, पोस्ट सर्वात जास्त आवडली याचीही माहिती मिळेल. तुमच्याकडे क्रिएटर किंवा बिझनेस अकाउंट असेल, तरच तुम्ही हे सर्व तपशील पाहू शकता. हे सगळे योग्य तपशील पाहून तुम्ही तुमची रील पोस्ट करू शकता.
सक्रिय वापरकर्त्यांचा पर्याय
तुम्ही इंस्टाग्रामवर सकाळी 6, 9, दुपारी 12 आणि दुपारी 3, 6 वाजता रील्स पोस्ट करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही रात्री 9 ते 11-12 दरम्यान रील्स देखील पोस्ट करू शकता. या काळात बहुतेक लोक इंस्टाग्रामवर सक्रिय असतात. अशा परिस्थितीत तुमची रील (Instagram Reel) अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते.
तुम्ही तुमच्या अकाउंटचा डॅशबोर्ड उघडताच, तुम्हाला शेवटी ही वेळ मिळेत. तुम्ही Insights वर जाऊन सक्रिय वापरकर्त्यांचा पर्याय देखील पाहू शकता. यानुसार तुम्ही तुमचे कंटेट इंस्टाग्रामवर पोस्ट करत (Instagram Reels Posting Time) जा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.