Natural Weight Loss Tips Google
लाईफस्टाईल

Natural Weight Loss Tips: ना डाएट ना जिम... आहारात करा फक्त 'हे' बदल, वजन होईल झटपट कमी

Natural Weight Loss Diet Tips : रोजच्या आहाराचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे फॅट वाढतो. पुढे आपण वजन कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? हे जाणून घेणार आहोत.

Saam Tv

Natural Weight Loss Diet Tips : एखादा माणूस लठ्ठ होत असेल, तर त्याच्या शरीरासोबत मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. सध्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी याचं मुळ कारण आहे. तुम्ही दिवसभर जे काही अन्न खाता. त्याच पद्धतीने तुमचे शरीर कार्य करते. याने लठ्ठपणाच्या समस्या वाढत असतात. एकदा माणूस लठ्ठ झाला, तर त्याचं वजन कमी होणं फार कठीण असतं. म्हणून वजन वाढेल असेल तर तुम्ही वेळीच आहारात बदल केले पाहिजेत. पुढे आपण वजन कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? हे जाणून घेणार आहोत.

तुम्ही जितके फॅट वाढवणारे तेलकट पदार्थ, मैदा, गोड पदार्थ खाता. तितके तुमचे वजन वाढते. त्यामुळे असे पदार्थ खाणे जमेल तितके टाळले पाहिजे. तुमच्या दैनंदिन आहारात तुम्ही कॅलरीजचे सेवन कमी केले पाहिजे. कमी कॅलरीज असणारे पदार्थ सेवन केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. आहारात तुम्ही चिया सिड्स, मासे, फ्लॉवर, छोले, सफरचंद, ड्रायफ्रुट्स आणि अवोकाडोचा समावेश केला पाहिजे. अन्य पदार्थ खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य असतीलच असे नाही. अशाच योग्य आहारामुळे तुमचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते.

प्रथिनेयुक्त आहार (High Protein Foods)

प्रथिनेयुक्त आहार तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. त्यामध्ये उकडलेली अंडी, डाळी, टोफू, दूध आणि दही हे पदार्थ तुम्ही सेवन करू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. सतत भूक लागत नाही. तसेच फायबरयुक्त अन्न गहू, हिरव्या भाज्या, ओट्स, ताजी फळे यांमुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.

हिवाळ्यात कोणते पेय शरीरासाठी फायदेशीर असते?

वजन कमी करण्यासाठी हेल्दी फॅट्स शरीरात असणे महत्वाचे असते. त्यामध्ये तुम्ही अक्रोड, बदाम, फ्लॅक्ससीड या ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता. शिवाय थोड्या प्रमाणात ऑलिव्ह ऑइल आणि अवोकाडोचा सुद्धा समावेश करू शकता. याशिवाय खूप पाणी पिणं हा वजन कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्यामध्ये तुम्ही काकडी, कलिंगड, नारळ पाणी, लिंबू पाणी असे पदार्थ खावेत. हे पदार्थ उन्हाळ्यात खाणे सुद्धा फायदेशीर ठरतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT