Saam Tv
महाराष्ट्रात गरमा गरम भजी आणि आलं घातलेला चहा हा आवडता नाश्ता आहे.
तुम्हाला कमी वेळात हा नाश्ता तयार करता येऊ शकतो. चला जाणून घेऊ रेसिपी
कांदा, बेसन, हळद, मीठ, मसाला, धणे पावडर, ओवा, सोडा, तेल, कोथिंबीर इ.
आधी कांदा उभ्या आकारात चिरून घ्या.
आता एका वाडग्यात कांदा, बेसन,हळद, मीठ, मसाला, धणे पावडर, ओवा, कोथिंबीर मिक्स करा.
कांदा भजी चमच्या शिवाय हाताने मिक्स केल्याने अधिक टेस्टी होतात.
आता कढईत तेल गरम करा. तेल तापलं की, मध्यम आचेवर भजी तळून घ्या.
भजी सोडताना काटेरी चमचा वापरा. भजी दोन्ही भाजूंनी तळून घ्या.
आता दुसरी कडे दुधाचा आलं घातलेला चहा बनवायला घ्या.
चला तयार आहे तुमचा झटपट नाश्ता.