World food day saam tv
लाईफस्टाईल

World food day: तुम्हाला माहितीये का फूड एलर्जी आणि फूड इंटोलेरेंसमधील नेमका फरक? तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

World food day: अन्नाची ऍलर्जी आणि फूड इंटोलेरेंस या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. या दोन्ही गोष्टी कशा आहेत, त्यांची कारणं, लक्षणे आणि तीव्रता काय आहेत हे आज आपण जाणून घेऊया.

Surabhi Jagdish

आज १६ ऑक्टोबर म्हणजे वर्ल्ड फूड डे. अन्नाची ऍलर्जी आणि फूड इंटोलेरेंस या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. या दोन्ही गोष्टी कशा आहेत, त्यांची कारणं, लक्षणे आणि तीव्रता काय आहेत हे आज आपण जाणून घेऊया. योग्य निदान आणि उपचार व्यवस्थापनासाठी हे फरक समजून घेणं आवश्यक आहे.

एखाद्या खाद्यपदार्थाची एलर्जी होण्यामद्ये रोगप्रतिकारक प्रणालीचा समावेश असतो. अन्नाची ऍलर्जी असलेली एखादी व्यक्ती विशिष्ट पदार्ख खाते तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती चुकून ते हानिकारक पदार्थ म्हणून त्याकडे पाहते आणि एलर्जीची प्रतिक्रिया उत्तेजित करते. या प्रतिक्रियेमुळे इम्युनोग्लोबुलिन E (IgE) एंटीबॉडीज तयार होतात.

यामुळे शरीरात हिस्टामाइन आणि इतर रसायनं तयार होतात. या रसायनांमुळे लक्षणं उद्भवतात जी सौम्य ते गंभीर असू शकतात. यामध्ये अंगावर पित्ताच्या गाठी उठणं, सूज येणं, श्वास घेण्यात अडचण येणं हा त्रास होऊ शकतो. या समस्येवर वेळीच उपचार घेणं गरजेचं असतं.

सामान्यपणे फूड एलर्जीमध्ये शेंगदाणे, ट्री नट्स, शेलफिश, मासे, दूध, अंडी तसंच गहू यांचा समावेश होतो. लक्षणांची सुरुवात सामान्यतः ऍलर्जीक अन्न खाल्ल्यानंतर काही मिनिटांपासून काही तासांच्या आत होते. फूडची ऍलर्जी असलेल्या व्यक्तींसाठी असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे

फूड इंटोलेरेंस

या शिवाय दुसरीकडे फूड इंटोलेरेंसमध्ये रोगप्रतिकारक शक्तीचा समावेश होत नाही. ज्यावेळी पचनसंस्था काही खाद्यपदार्थ योग्य प्रकारे पचन करू शकत नाही तेव्हा इंटोलेरेंस उद्भवते. हे एंजाइमच्या कमतरतेमुळे असू शकतं.

यामध्ये कशा पद्धतीची लक्षणं दिसून येतात

फूड इंटोलेरेंसची लक्षणं सामान्यतः फूड एलर्जीपेक्षा कमी गंभीर असतात. सामान्यत: पचनसंस्थेचा समावेश होतो. यामध्ये पोट फुगणं, गॅस, अतिसार, पोटदुखी आणि क्रॅम्स यांचा समावेश होतो. ही लक्षणं दिसायला जास्त वेळ लागू शकतो. अनेकदा अयोग्य पदार्थ खाल्ल्यानंतर काही तासांनी याचा त्रास दिसून येतो.

यामध्ये मुख्य अंतर काय असू शकतं

अन्न ऍलर्जी आणि फूड इंटोलेरेंस यातील मुख्य फरक रोगप्रतिकारक यंत्रणेचा आहे. फूड एलर्जीमुळे रोगप्रतिकारक प्रणालीला धोका निर्माण होऊन ही समस्या जीवघेणी ठरू शकते. तर फूड इंटोलेरेंस पचनाच्या समस्यांमुळे होतं आणि सहसा जीवाला धोका नसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? आज ठरणार! मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT