High cholesterol causes saam tv
लाईफस्टाईल

High Cholesterol: कोलेस्टेरॉल कशामुळे वाढतं? तुमची 'ही' सवय आहे कारणीभूत; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Heart Health : आळशी जीवनशैली, तळलेले व प्रक्रिया केलेले पदार्थ यामुळे कोलेस्टेरॉल वाढतो. डॉक्टरांच्या मते योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वार्षिक लिपिड प्रोफाइल तपासणीने हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.

Sakshi Sunil Jadhav

धकाधकीच्या जीवनामुळे माणूस थकून जातो. शरीर त्याला इतर गोष्टी करायला साथ देत नाही. त्यामुळे बऱ्याच चांगल्या सवयी त्यांना फॉलो करणं जमत नाही किंवा त्यांच्याकडे वेळ मिळत नाही. कारण दिवस हा २४ तासांचा असतो. यामध्ये काम, घरातली कामं, लांबचा गर्दीतला प्रवास आणि सोशल मीडियाचा वापर, कधीकधी बाहेरचं खाणं या सवयींनी लोक इतर महत्वाच्या गोष्टींकडे काना डोळा करताना दिसतात. यानेच गंभीर आणि जीवघेण्या आजारांना निमंत्रण मिळतं.

कारण आळशी लाइफस्टाइल आणि अन् हेल्दी आहारामुळे कोलेस्टेरॉलची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे तुमचं फॅट वाढतं. ज्या वेळेस त्याचं प्रमाण जास्त होतं तेव्हा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि हाय बीपीचा धोका वाढतो.

दिल्ली एमसीडीचे डॉक्टर Dr Ajay Kumar यांच्या मते, कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठी सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या दिवसांच व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. त्यात विशेष म्हणजे तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. तळलेले, प्रक्रिया केलेले आणि तेलकट पदार्थ कमी करून ताजी फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि ओट्स, जवस, शेंगदाणे यांसारख्या चांगल्या फॅटयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामध्ये कोणतंच काम नाही.

तर यात तुमचा जास्त पैसाही जात नाही. दिवसातून 30 मिनिटे वेगाने चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा रोज अर्धा तास योगासने केल्याने चांगले एचडीएल (चांगले कोलेस्टेरॉल) वाढण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील एलडीएल (खराब कोलेस्टेरॉल) 100 mg/dL पेक्षा कमी आणि एकूण कोलेस्टेरॉल 200 mg/dL पेक्षा कमी असणे यामध्ये महत्वाचे असते. 40 वर्षांनंतर दरवर्षी लिपिड प्रोफाइल तपासणी करणंही यात महत्वाचं आहे, कुटुंबात कोणाला हृदयविकाराचा आजार असल्यास जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे.

धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयींमुळे रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतो, त्यामुळे या सवयी टाळाणं तुमच्या हिताचं ठरेल. सतत थकवा, छातीत जडपणा, श्वास घेण्यास त्रास किंवा हात-पाय सुन्न होणे अशी लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या वित्तीय समितीवरून पुन्हा वाद, आयुक्त नगरसेवक आमने-सामने

Shocking : लग्नाला मुलगी मिळेना, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT