Lizard Chirping: घरात बोलताना पाल चुकचुकली तर सगळं बोलणं होतं खरं? यामागचं कारण एकदा नक्कीच वाचा

Sakshi Sunil Jadhav

लोकांचा समज?

महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना पाल चुकचुकली. तर ती चर्चा किंवा बोललेली गोष्ट खरी ठरते, असा मागील अनेक दिवसांपासून समज आहे.

lizard chirping omen meaning

'सत्य' होतं का?

जेव्हा एखादी व्यक्ती भविष्यातील काही गोष्टीवर चर्चा सुरू असते आणि नेमकी त्याच वेळी पाल चुकचुकते. त्यावेळी ते बोलणे खरे होणार, असे आवर्जून म्हटले जाते.

house lizard superstition India

ईश्वरी संकेत?

अनेक लोक पालीस 'सरस्वतीचे' रूप मानतात. त्यामुळे तिच्या आवाजाला दैवी संमती किंवा ईश्वरी आशीर्वाद मानले जाते.

scientific reason lizard sound

शुभ की अशुभ?

साधारणपणे बोलताना पाल चुकचुकणे शुभ मानले जाते. पण पालीचे पडणे किंवा अंगाच्या कोणत्या भागावर पाल पडते त्यावरून शुभ-अशुभ असे दोन्ही अर्थ काढले जातात.

scientific reason lizard sound

वैज्ञानिक बाजू काय?

विज्ञानानुसार, पाल चुकचुकणे हा तिचा नैसर्गिक आवाज आहे. कीटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा इतर पाल्यांशी संवाद साधण्यासाठी ती हा आवाज काढते. त्याचा मानवी संवादाशी कोणताही संबंध नाही.

scientific reason lizard sound

मानसिक दिलासा?

हा वर्षानुवर्षे समज आहे. पण सकारात्मक गोष्ट बोलताना पाल चुकचुकते, तेव्हा त्या व्यक्तीला एक प्रकारचा मानसिक आधार आणि आत्मविश्वास मिळतो.

scientific reason lizard sound

काळाप्रमाणे बदल?

पूर्वी या गोष्टींवर खूप विश्वास ठेवला जायचा. आताच्या काळात ही केवळ एक 'म्हण' किंवा गंमत म्हणून पाहिली जाते.

scientific reason lizard sound

पालीचे महत्व

पालीस घराची रक्षक मानले जाते, कारण ती घरातील उपद्रवी कीटक खाते.

scientific reason lizard sound

दिशांचे महत्त्व?

ज्योतिषशास्त्रात पाल कोणत्या दिशेला बसून चुकचुकते, यालाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक दिशेनुसार त्याचे वेगवेगळे फळ सांगितले जाते.

Lizard | saam tv

नेमकं खरं काय?

'पाल चुकचुकणे' हा विषय अनेकांसाठी निव्वळ योगायोग आहे. अनेकांसाठी तो एक आशेचा किरण असतो.

NEXT: Cat Lifespan Facts: घरात पाळलेली मांजर किती वर्षे जगू शकते? आश्चर्यकारक माहिती

cat fact
येथे क्लिक करा