Benefits Of Almond Milk Saam Tv
लाईफस्टाईल

Benefits Of Almond Milk: रात्री आणि दिवसा कधीही प्या बदाम दूध; त्वचा आणि केसांच्या आरोग्याला होतील फायदे

Almond Milk Adavantages in Marathi: बदाम हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपोयोगी असते. योग्य प्रमाणात खाल्ल्यास बदामामुळे शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चांगल्या आरोग्यासाठी दूध पिणे हे कायम फायदेशीर असते हे सर्वांना माहिती आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का साधारण दुधात तुम्ही काही बदाम टाकून प्यायले तर त्याचे प्रत्येकाच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

दूधात आणि बदाममध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक आढळतात. अनेकदा डॉक्टरही सकाळी उठल्यानंतर बदाम खाण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? बदाम दूध प्यायल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. यामुळे हाडे मजबूत होतात. एवढेच नाही तर बदामाचे दूध प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांमधून सुटका मिळते

दुधात तसेच बदाममध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात शिवाय कॅल्शियम ,प्रथिने आणि मॅग्नेशियमचे प्रमाण आढळून येते. या सर्वांबरोबर बदामामध्ये व्हिटॅमिन ई(Vitamin-E) ,फायबरही आढळते.

बदाम दूध पिण्याचे फायदे

त्वचेसाठी आणि केसांसाठी

दूध आणि बदाम यांचे एकत्र सेवन करणे हे प्रत्येकाच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. बदामामध्ये आढळत असलेले व्हिटॅमिन ई हे त्वचा चमकदार बनवते आणि केसांची वाढ होण्यास मदत करतात.

हाडांचे आरोग्य- बदामाचे दूध प्यायल्याने तु्मची हाडे मजबूत होण्यास मदत होते. ज्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी असते,त्याही व्यक्तींनी बदामाचे दूध प्यावे.

प्रतिकारशक्ती (Immunity)

प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी दररोज बदामाच्या दूधाचा आहारात समावेश करावा. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

कसे आणि केव्हा सेवन करावे ?

बदामाचे दूध कधी प्यावे हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असेल. त्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तसेच सकाळी उठल्यानंतर बदामाच्या दूधाचे सेवन करा. एक ग्लास दुधात ४-५ बदाम वाटून टाका. त्यासाठी दूधी गरम दूधाचा वापर करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

SCROLL FOR NEXT