Weight Loss In Winter  Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss In Winter : हिवाळ्यात सुटलेलं पोट राहिल नियंत्रणात! असा तयार करा डाएट प्लान

Weight Loss Tips : वाढत्या वजनामुळे हल्ली अनेक लोक त्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या काही गोष्टींवर नियंत्रण ठेवले तर सुटलेलं पोट नियंत्रणात राहू शकते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

कोमल दामुद्रे

Winter Care Tips :

हिवाळ्यात वातावरणात गारवा असतो त्यामुळे सकाळी आपण व्यायाम किंवा जॉगिंगला सहसा बाहेर पडत नाही. त्यामुळे शरीराची पुरेशा प्रमाणात हालचाल होत नाही.

या काळात अनेकदा फॅट आणि साखरेचे प्रमाण असलेले पदार्थ खाण्याची चव जिभेवर रेंगाळते. परंतु, याचे सेवन केल्याने वजन वाढते. वाढत्या वजनामुळे हल्ली अनेक लोक त्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या काही गोष्टींवर नियंत्रण ठेवले तर सुटलेलं पोट नियंत्रणात राहू शकते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. बेरी

बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. याचे सेवन केल्याने आरोग्याला (Health) अनेक फायदे होऊ शकतात. यामुळे वजन कमी (Weight Loss) होण्यास देखील मदत होते. यामध्ये खूप कमी कॅलरी आणि फायबर असते.

2. पालक

पालक ही आरोग्यांसाठी गुणकारी मानली जाते. यामध्ये अनेक जीवनसत्त्व आणि खनिजे आहेत. जे आरोग्यासाठी (Benefits) खूप फायदेशीर आहेत. यामध्ये फायबर अधिक आढळते. ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहून वजन कमी करण्यास मदत होते.

3. गाजर

हिवाळ्यात नियमितपणे गाजर खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहाते. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि फायबर आहे. तसेच कॅलरीदेखील आहे. ज्यामुळे याचे सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होत नाही. भूकही लागत नाही.

4. एवोकॅडो

एवोकॅडो खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर आणि अनेक खनिजे देखील आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यात खूप मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT