Weight loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight loss Tips : पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोज सकाळी 'हे' सूप प्या, आठवड्याभरात फरक दिसेल

वाढलेल्या वजनाचे कारण हे चुकीची जीवनशैली, आहार व जास्त ताण घेतल्यामुळे होतो.

कोमल दामुद्रे

Weight loss Tips : आजकाल लठ्ठपणा ही एक सर्वसामान्य बनली आहे. वाढलेल्या वजनाचे कारण हे चुकीची जीवनशैली, आहार व जास्त ताण (Stress) घेतल्यामुळे होतो. काहींना हे अनुवांशिक देखील असू शकते.

वजन संतुलित ठेवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ नेहमी जंक फूड टाळण्याचा सल्ला देतात. जंक फूड खाल्ल्याने कॅलरीज वाढतात. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते. जर तुम्हीही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर या सूपचे रोज सेवन करा. या सूपच्या सेवनाने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. जाणून घेऊया.

1. मिक्स व्हेज सूप

Mix veg Soup

मिक्स व्हेज सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात, जे विविध प्रकारच्या रोगांवर प्रभावी असतात. मिक्स व्हेज सूप तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकता. यासाठी ताज्या हिरव्या भाज्या चिरून चांगल्या उकळा. त्यात थोडे मीठ आणि मिरपूड टाकून गरम करा. तुमचे मिक्स व्हेज सूप तयार आहे. याच्या सेवनाने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

2. चिकन सूप

Chicken Soup

डॉक्टर (Doctor) नेहमी आजारी व्यक्तीला चिकन सूप पिण्याचा सल्ला देतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे पीडित व्यक्तीला रोगाशी लढण्याची ताकद मिळते. त्याचबरोबर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. चिकनमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. हे डाएटिंगमध्ये फायदेशीर ठरते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा आहार घेत असाल तर तुम्ही चिकन सूपचे सेवन करू शकता.

3. गाजर सूप

Carrot Soup

गाजर हे डोळ्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. त्याच्या सेवनाने आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. याशिवाय गाजरात फायबर मुबलक प्रमाणात आढळते. फायबर युक्त अन्नाच्या सेवनाने लालसेच्या समस्येवर मात केली जाते. तसेच पोट बराच काळ भरलेले राहते. यासाठी आरोग्य तज्ज्ञ लठ्ठपणाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी गाजराचे सूप पिण्याचा सल्ला देतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT