Weight loss tips, Weight loss, Diet plan ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : वाढलेल्या वजनापासून त्रस्त आहात? या गोष्टी दिवसभरात केल्याने होईल पटकन वजन कमी

सतत वाढणारे वजन कमी कसे कराल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : वाढलेले वजन ही सामान्य बाब असली तरी पुढे जाऊन हा एक आजार बनू शकतो. वाढलेल्या वजनामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

हे देखील पहा -

आपल्यापैकी बऱ्याच जणांना वजन कमी करायचे असते. रोज व्यायाम किंवा जीमला जाऊन देखील वजन कमी होण्याचे नाव काही घेत नाही. वाढलेल्या वजनामुळे आपला ताण व थकवा वाढत जातो. घरच्या घरी व्यायाम करुन देखील आपले वजन काही कमी होण्याच्या मार्गावर नसते. व्यायामासोबत आपल्याला आहारसुध्दा योग्य प्रमाणात घ्यायला हवा. जंक फूड, तेलाचे व मसाल्याचे पदार्थ आहारात कमी करायला हवे. दिवसभरात कोणत्या गोष्टी केल्याने आपले वजन कमी होईल हे जाणून घेऊया.

१. आपले वजन वाढू न देण्यासाठी आपल्या सकाळी लवकर उठणे गरजेचे आहे. रात्री लवकर झोपून आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वी उठायला हवे. लवकर उठल्यानंतर शरीर डिटॉक्सिफाय करायला विसरू नका.

२. शरीरातील विघटक काढण्यासाठी सकाळी डिटॉक्स ड्रिंकचे सेवन करा. त्यासाठी आपण कोमट पाण्यात लिंबाच्या रसासोबत मधाचे सेवन करु शकतो.

३. सकाळी व्यायाम किंवा वॉर्मअप करायला विसरु नका. वॉर्मअप करण्याची वेळ सुनिश्चित करा. वॉर्मअप केल्यामुळे स्नायू मोकळ्या होण्यास मदत होईल. रोज किमान अर्धा तास व्यायाम केल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होईल.

४. वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आपण टो टच एक्सरसाइज करु शकतो. हा व्यायाम १५ मिनिट केल्याने आपल्याला त्याचा फायदा होईल. तसेच पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपण पुशअप्स, एअर सायकलिंग व उठाबशासारखे व्यायाम केल्याचे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल.

५. दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी (Water) पिणे गरजेचे आहे. साखरेऐवजी गुळाचे सेवन करा. आहारांमध्ये प्रथिने, डाळी, चणे, राजमा व पनिराचा समावेश करा. तसेच पाण्याचे अधिक सेवन केल्यास वजन कमी होते.

६. आहारात पांढऱ्या पदार्थांचा समावेश टाळा. तसेच तेल, तूप, मसाल्याचे पदार्थ व जंक फूडचे ही सेवन करणे टाळा. यामुळे वजन वाढते.

७. वजन न वाढण्यासाठी डाएट चार्ट बनवा. नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण अशा सगळ्यांच्या वेळा फिक्स करा. आहार हिरव्या पालेभाज्या व सलादचा जास्तीत जास्त सेवन करा. दुपारी किंवा सायंकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर भाजलेले चणे किंवा शेंगदाण्याचे सेवन करा. यामुळे आपल्याला फायबर मिळेल. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT