Warm up exercise Tips in Marathi, Fitness Tips in Marathi, Body Fitness Tips
Warm up exercise Tips in Marathi, Fitness Tips in Marathi, Body Fitness Tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Exercise : या पाच कारणांमुळे आवश्यक आहे वॉर्मअप एक्सरसाइज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सामान्यत: लोक व्यायामाला महत्त्व देत नाहीत. वॉर्मअप सामान्यत: स्नायू बळकट बनविण्यासाठी किंवा कॅलरीज बर्न करण्यासाठी सहायक नसते, पण कोणताही व्यायाम यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे दररोज वॉर्मअप (warm up) करणे. आपण जाणून घेऊ, ही पाच कारणे ज्यामुळे वॉर्मअप एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. (Warm up exercise Tips in Marathi)

हे देखील पाहा -

१. स्नायू तयार होतात- वॉर्मअप करण्याने शरीराचं तापमान वाढते. हे विशेषत: शरीरातील पेशींसाठी फायदेशीर ठरते. शरीराचं तापमान वाढल्याने पेशींना आँक्सिजनचा (Oxygen) अधिक चांगला पुरवठा होतो. ज्यामुळे त्या ताणल्या जाण्यास किंवा रिलॅक्स होण्यास जास्त समस्या येत नाही. यामुळे अवघड व्यायाम देखील सोपा होतो.

२. हार्ट अटॅकची शक्यता कमी होते - वॉर्मअपमुळे हृदयालाही वर्कआऊटसाठी तयार करण्याची संधी मिळते. यामुळे हृदयावर अनावश्यक दबाव पडत नाही. वर्कआऊट करताना किंवा व्यायामानंतर लगेच हार्ट अटॅकच्या केसेस पाहायला मिळतात. असे योग्य प्रकारे वॉर्मअप न करण्याने होते. जर योग्य प्रकारे वॉर्मअप केले तर, वर्कआऊटदरम्यान किंवा लगेच हार्ट अटॅक (heart attack) येण्याची शक्यता कमी होईल.

३. दुखापतीची शक्यता कमी होते - वॉर्मअप करण्याने स्नायूंची लवचिकता वाढते. ज्यामुळे व्यायामादरम्यान स्नायूंमध्ये दुखापत होण्याची शक्यता खूप कमी होते. अशाच प्रकारे वर्कआऊटनंतर कूलडाउन करण्यानेही स्नायू रिलॅक्स होतात आणि वेदना किंवा सूज येण्याची शक्यता कमी होते.

४. मानसिकरित्या तयार होण्यास मदत मिळते - वर्कआऊटसाठी मानसिकरित्या तयार असणंही खूप आवश्यक आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार नसाल, तर यामुळे कोणताही व्यायाम अवघड वाटू लागतो. यामुळे कोणताही व्यायाम अर्धवट सोडला जाण्याची शक्यता वाढते. योग्य वॉर्मअप करण्याने मेंदू आणि शरीर दोन्ही व्यायामासाठी तयार होईल आणि अवघड व्यायाम सोपा होईल.

५. मशिनवर व्यायाम सोपा होतो - वॉर्मअप करण्याने व्यायामादरम्यान उत्तम कामगिरी करण्यास मदत होते. याचा फायदा असा होतो की, व्यायामादरम्यान मशिनीचा वापर करणे सोपे जाते. वॉर्मअप करण्यापूर्वी स्नायू बनविणाऱ्या मशिनचा अजिबात वापर करता कामा नये.

वॉर्मअप एक्सरसाइज हा प्रत्येक व्यायामाचा आवश्यक भाग आहे. वॉर्मअप करण्याने शरीर कार्डिओव्हॅस्क्युलर (cardiovascular) आणि मस्कुलोस्केलेटल व्यायामासाठी तयार होते.

डिस्क्लेमर: सदर व्यायाम फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कृपया तुमच्या ट्रेनरचा योग्य तो सल्ला घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

SCROLL FOR NEXT