brain Tumors freepik
लाईफस्टाईल

Brain Tumor Yoga: ब्रेन ट्यूमरचा धोका कमी करायचाय? करा 'हे' ३ योगासने होतील अनेक फायदे

Yoga For Brain: काही योगासने मेंदूला शांती देतात, मज्जासंस्था बळकट करतात आणि रक्त परिसंचरण सुधारतात, ज्यामुळे ब्रेन ट्यूमरसारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

Dhanshri Shintre

दरवर्षी ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिन साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमधील किंवा त्याच्या आजूबाजूच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा आजार. अहवालानुसार, सध्या जगभरात १० लाखांहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत. या दिवसाचा उद्देश लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरच्या धोका आणि प्रतिबंध याबाबत जागरूकता वाढवणे आणि शिक्षित करणे हा आहे.

ब्रेन ट्यूमरच्या धोका कमी करण्यासाठी वेळेवर सावधगिरी आणि योग्य आरोग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. योगा, विशेषतः काही विशिष्ट आसने मेंदूला शांत ठेवण्यास, मज्जासंस्थेच्या मजबुतीसाठी आणि रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे या आजाराचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. नियमित योगा केल्याने मेंदू आणि शरीराचे आरोग्य सुधारते आणि ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकते.

प्राणायाम

प्राणायाम मेंदू निरोगी ठेवतो. अनुलोम-विलोम, भ्रामरी आणि कपालभाती प्राणायाम ऑक्सिजन पुरवून ताण कमी करतात. भ्रामरी प्राणायाम राग, चिंता कमी करून मानसिक शांती वाढवतो, ज्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास सुधारतो.

शीर्षासन

हे योगासन मेंदूचा रक्तपुरवठा वाढवते आणि ऑक्सिजन पुरवठा सुधारते. शीर्षासनामुळे लक्ष आणि एकाग्रता वाढतात, तसेच तणाव आणि चिंता कमी होतात. मात्र, रक्तदाब किंवा गर्भाशय ग्रीवाचा त्रास असल्यास, हे आसन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच करावे.

ताडासन

या आसनाचा नियमित सराव केल्याने शरीराचे स्नायू लवचिक बनतात आणि फुफ्फुसांचा विस्तार होऊन ते स्वच्छ होतात. खोल श्वास घेतल्यामुळे श्वासोच्छ्वास संतुलित राहतो आणि एकाग्रता वाढते, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT