Muscle Gain Diet, Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Muscle Gain Diet : मसल्स बनवायचे आहेत? जीमला जाण्यापेक्षा या पदार्थांचा आहारात समावेश करा

मसल्स वाढवायची आहे या पदार्थांचे सेवन करा

कोमल दामुद्रे

Muscle Gain Diet : स्नायूंना बळकट बनवण्यासाठी आपण योगा किंवा जीमला जाण्याचा विचार करतो. तसेच आपण आपल्या आहारात देखील बदल करतो.

स्नायू बनवताना आपला आहार व्यायामाइतकाच महत्त्वाचा आहे. जर आपण आहारात फक्त आरोग्यदायी पदार्थ खाण्याचा विचार करत असाल तर स्नायूंच्या वाढीसाठी काही मूलभूत गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

मांसपेशी वाढवण्यासाठी कोणते पदार्थ किंवा आहार घ्यावा याबद्दल अनेक लोक गोंधळलेले असतात. त्यासाठी आहारात कोणते पदार्थ घ्यायला हवे हे जाणून घेऊया.

आपण स्नायू तयार करत असाल किंवा चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, हे सर्व कॅलरी आणि मॅक्रोवर अवलंबून असते. आपल्या आहारात कोणतेही घटक असो. जर आपण योग्य प्रकारे मसल्स बनवण्याचा प्रयत्न करत असू तर आपल्याला कळेल ते जास्त कशाने बर्न होते व जास्त कॅलरी कशात आहे हे कळते.

स्नायू बळकट करण्यासाठी आहार निवडताना आपण कडधान्य, फळे, भाज्या, नट व शेंगा खाणे आवश्यक असतात. यामध्ये अधिक प्रमाणातून आपल्याला प्रथिने मिळू शकते.

ज्यावेळी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपण जेवणात किती पदार्थ खातो व त्याचे योग्य वेळ कोणती हे समजून घ्या. आपल्याला मिळणाऱ्या दैनंदिन पोषकतत्वात मॅक्रोपर्यंत पोहोचवण्यासाठी दररोज किमान ६ पदार्थांचे (Food) सेवन करायला हवे. ते कोणते हे जाणून घेऊया.

मिल - १

केळी, काकडी, आले, हिरवे सफरचंद आणि लिंबाचा ताज्या कच्च्या रस तसेच बदामाचे दूध आणि केळीसह प्रोटीन शेक

मिल - २

तळलेले टोफू १-२ त्यात ओट्सच्या पीठ किंवा २ चमचे पीनट किंवा बदाम बटर याचा समावेश करु शकतो.

मिल - ३

संपूर्ण गव्हाच्या ब्रेड व भाजीचा सॅण्डविच, अ‍ॅव्होकॅडो/चपातीचा अर्धा तुकडा, मसूरची डाळ आणि स्प्राउट्स तसेच टोमॅटो आणि पनीर/टोफूचे कोशिंबीर.

मिल- ४

२ कप दालचिनीच्या शिंपड्यासह ओटचे जाडे भरडे पीठ, पीनट बटर, १ सफरचंद व प्रोटीन शेक

मिल - ५

वाफवलेल्या भाज्यांसोबत क्विनोआ आणि फ्रेश व्हेजिटेबल सॅलड / मसूर सूप व वाफवलेल्या भाज्या आणि मूठभर काजू सह ग्रील्ड टोफू.

मिल - ६

केळी शेक किंवा प्रोटीन शेक व एक वाडगा ब्रोकोली सूप

सकाळी उठल्यानंतर पहिले मिल लगेच घेतले पाहिजे आणि शेवटचे जेवण झोपण्याच्या एक किंवा दोन तास आधी घेतले पाहिजे. उर्वरित जेवण दिवसभरात २ ते ३ तासांच्या अंतराने खाता येते.

जर हा डाएट (Diet) प्लॅन कायम ठेवायचा असेल तर सोयासारखे प्रथिन स्त्रोतांपासून बनवलेल्या प्रोटीन शेकची निवड करावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT