सध्या उन्हाचं तापमान वाढत चालले आहे. कोणालाच या दिवसांमध्ये बाहेर फिरायला जायला आवडत नाही. थोडा वेळा कामापुरती गेलं तरी अंग घामाने ओलं होतं. त्यामुळे बरीच मंडळी कमी उन्हाळ्यात व्यायाम करायचा थोडा कंटाळा करतात. पण व्यायामाची शरीराला सवय झाली असेल आणि ती अचानक मोडली तर तुम्हाला पुन्हा ती सुरु करायला वेळ लागतो. आता टेन्शन सोडा, तुम्हाला जर उन्हाळ्यात व्यायामाला कंटाळा असेल तर तुम्ही फक्त १५ मिनिटं चालून अनेक फायदे मिळवू शकता.
चालण्याचे फायदे
चालण्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणं सगळ्यात फायदेशीर ठरु शकतं. याने तुमच्या अनेक समस्या म्हणजे ताण, पचनसंस्था, ह्रदयाची वाढती धडधड, झोपेचा त्रास अशा पद्धतीच्या तक्रारी कमी करु शकता. कारण तुम्ही bp चे रुग्ण आहात आणि हालचालच केली नाहीत तर तुमच्या शरीराला बीपीसोबत अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी निकामी होणे अशाप्रकारच्या जीवघेण्या आजारांचा समावेश असतो. म्हणूनच दिवसातून काही वेळ चाला. या अगदी सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
रक्तदाब नियंत्रणात कसा आणायचा? How to control BP naturally?
चालण्याने तुमच्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. रोज चालल्याने तुम्हाला हा फरक जाणवेल. तज्ज्ञांच्या मते, फक्त औषधं खाऊन कोणताच आजार बरा होत नाही. त्यासाठी तुम्हाला आहार, व्यायाम, पुरेशी झोप यासगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं महत्वाचं ठरतं. सुरुवातीला सगळेच नियम फॉलो करणं कठीण असतं. पण एक छोटी सवय तुम्हाला काही गंभीर आजारांपासून वाचवू शकते. त्यात रोज व्यायाम जमत नसेल तर चालल्याने सुद्धा यामध्ये फरक जाणवतो. तुमच्या श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला चालणे हा व्यायाम फायदेशीर ठरु शकतो. याने तुमच्या वजन वाढीच्या समस्याही कमी होतात. टेन्शन कमी होतं. रिलॅक्स वाटतं. सलग चालल्यामुळे शरीर थोडं थकतं आणि तुम्हाला पुरेशी शांत झोप लागते.
दिवसाला किती वेळ चालले पाहिजे? How much should you walk in a day?
तज्ज्ञांच्या मते तुम्ही आठवड्याला किमान १५० मिनिटे चाललं पाहिजे. त्यासाठी किमान ३० मिनिटं तुम्ही आठवड्याला चाललं पाहिजे. म्हणजेच दिवसभरात तुम्ही किमान १५ मिनिटं सलग चाललं पाहिजे. ही छोटी सुरुवात आहे. बऱ्याचदा वृद्धांना फारसं चालणं जमत नाही. त्याच्यासाठी हा नियम योग्य ठरतो. पुढे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार वेळेत वाढ करु शकता. याआधी तुम्ही तुमच्या जवळच्या तज्ज्ञांकडून याबाबत सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.