Vivo Watch 3 Saam Tv
लाईफस्टाईल

Vivo Watch 3 : एकदा चार्ज करा दोन आठवडे वापरा; दमदार बॅटरी बॅकअपसह Vivo ची नवी स्मार्ट वॉच लवकरच होणार लॉन्च

कोमल दामुद्रे

Vivo Watch 3 Price :

चिनी बाजारात Vivo X100 आणि Vivo X100 Pro सोबत, Vivo ने Vivo Watch 3 वॉच लॉन्च केली आहे. यामध्ये 1.43 इंच AMOLED डिस्प्ले मिळणार आहे.

ही स्मार्टवॉच स्टेनलेस स्टीलची बॉडी, रबर आणि लेदर स्ट्रॅप व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया या स्मार्टवॉची किमत आणि इतर फीचर्सबद्दल. या नवीन वॉच फ्लॅगशिप एक्स १०० सीरीज स्मार्टफोनसह बाजारात आले आहे. नवीन विवो वॉच ३ जुन्या २ ची जागा घेईल. तसेच या वॉचमध्ये अनेक अपग्रेड देण्यात आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. Vivo Watch 3 ची किंमत

Vivo Watch 3 ब्लूटूथ आणि eSIM सह येतो. हा ब्रँड सॉफ्ट रबर स्ट्रॅप आणि लेदर स्ट्रॅप पर्यायांमध्ये स्मार्टवॉच ऑफर करत आहे. Vivo Watch 3 प्री-ऑर्डरसोबत मिळणार आहे. 21 नोव्हेंबरपासून चीनमध्ये विकली जाईल. ब्लूटूथ स्मार्टवॉचची किंमत (Price) अदांजे 12,550 रुपये असू शकते. तसेच ही वॉच रबरच्या पट्ट्यासह मिळत आहे.

लेदरमध्ये ही वॉच खरेदी (Shopping) करायची असल्यास तुम्हाला अंदाजे १३, ७०० रुपये मोजावे लागू शकतात. तर E-SIM सपोर्ट स्मार्टवॉचची किंमत अंदाजे १४,८५० इतकी आहे.

2. Vivo Watch 3 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Watch 3 मध्ये AOD सपोर्टसह मिळत आहे. तसेच यामध्ये १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत. या नवीन स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजनची माहितीही मिळेल. हे स्मार्ट वॉच महिलांच्या मासिक पाळीची देखील नोंद ठेवेल.

3. Vivo Watch 3 वैशिष्ट्ये

या वॉचमध्ये 466×466 पिक्सेल रिझोल्यूशन आणि राउंड डायलसह 1.43-इंच AMOLED डिस्प्ले मिळत आहे. यामध्ये बेस्टटेकनिक BES2700BP SoC प्रोसेसरसह येणार आहे. त्यात Jovi AI सह BlueOS सॉफ्टवेअर देणार आहेत. 64 MB रॅम आणि 4 GB स्टोरेजसह ही वॉच कंपनी लॉन्च करणार आहे. तसेच बॅटरीबद्दल सांगायचे झाल्यास 505mAh सोबत १६ दिवस चार्ज करण्याचे टेन्शन राहाणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT