Vivah Muhurta 2023 Lagnache Muhrt- Saam Tv
लाईफस्टाईल

Vivah Muhurta 2023 : शुभमंगल सावधान! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लगीन घाई, शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या

Wedding Shubh Muhurt : २४ नोव्हेंबरला तुळशी विवाह असून यानंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होतील.

कोमल दामुद्रे

Wedding Muhurt in November-December 2023:

हिंदू धर्मात लग्न हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की, अशुभ काळात लग्नाची तारीख ठरवल्यावर वैवाहिक नात्यावर परिणाम होतो. यामुळे लग्नासारखे शुभ कार्य शुभ मुहूर्तानुसार केले जाते.

दिवाळीनंतर तुळशी विवाह झाला की, लग्नसराईला सुरुवात होते. अनेकजण तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्त पाहायला सुरुवात करतात. २३ नोव्हेंबरनंतर पाच महिन्यांचा चातुर्मास संपेल. या दिवशी विष्णू देव पुन्हा योगनिद्रेतून जागे होतील.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या २२ दिवसांपर्यंत लग्नासाठी एकही शुभ मुहूर्त नाहीये. त्यानंतर ८ दिवसांसाठी लग्नाचे ६ शुभ मुहूर्त आहेत. २३ नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आहे. तर २४ नोव्हेंबरला तुळशी विवाह असून यानंतर लग्नाचे मुहूर्त (Muhurt) सुरु होतील.

1. नोव्हेंबरमध्ये विवाह मुहूर्त कधी?

हिंदू पंचागानुसार २३ ते ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ८ दिवसांत लग्नासाठी ६ शुभ मुहूर्त आहेत. यापैकी नोव्हेंबरमध्ये ६ तर डिसेंबर ७ मुहूर्त असतील.

2. डिसेंबरमध्ये विवाह मुहूर्त कधी?

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ४ डिसेंबर, ५ डिसेंबर, ६ डिसेंबर, ७ डिसेंबर, ८ डिसेंबर, ९ डिसेंबर आणि १५ डिसेंबरला लग्नाचे शुभ मुहूर्त आहेत. तसेच नोव्हेंबर-डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यांमध्ये विवाह (Wedding) मुहूर्त ठरवता येऊ शकतात.

3. देवउठनी एकादशी कधी?

हिंदू पंचागानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी साजरी (Celebrate) केली जाते. त्याला विष्णुप्रबोधोत्सव म्हणूनही ओळखले जाते. यंदी ही एकादशी २३ नोव्हेंबरला असून २४ नोव्हेंबरला तुळशी विवाह असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT