Viral Video  Saam Tv
लाईफस्टाईल

Viral Video : चक्क ! लग्नात काढली नवरदेवाची गाढवावरुन वरात, वऱ्हाडी म्हणाले...

या नवरदेवाची गाढवावरून मिरवणूक काढली जात आहे.

कोमल दामुद्रे

Viral Video : सध्या सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. दिवसेंदिवस आपण त्यावर असे अनेक व्हिडिओ पाहत असतो, ज्यामुळे आपल्याला हसू कंट्रोल होत नाही. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिले असेल की, नवरदेवाची वरात ही घोड्यावरुन काढली जाते, पण नवरदेवाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या नवरदेवाची गाढवावरून मिरवणूक काढली जात आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. यात नवरदेवाची गाढवावरुन काढलेल्या मिरवणुकीचा व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही. (Latest Marathi News)

महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागात गाढवावरुन मिरवणूक आजही काढली जाते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असेच काहीसे दिसत आहे. वाजतगाजत निघालेल्या या मिरवणुकीत नवरामुलगा गाढवावर बसला असून, इतर लोक नाचत आहेत. त्याचबरोबर "आज मेरे यार की शादी है" या गाण्यावर वऱ्हाडी नाचत आहेत. या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट देखील येत आहेत.

दरम्यान, घोड्यावरून वरात निघताना आपण पाहिली असेल, पण गाढवावरून वरात निघताना आपण पहिल्यांदाच बघत असाल. काही गावांत जावयाला गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे, पण लग्नात गाढवावर बसून वरात निघाल्याचा हा व्हिडिओ (Video) आपणही पहिल्यांदाच बघत असाल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT