Alcohol effect on mosquito attraction : दारू पिणाऱ्यांनाच डास जास्त चावतात...होय, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल...मात्र, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय...पण, खरंच दारू पिणाऱ्यांनाच जास्त डास चावतात का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
जे बिअर, दारू जास्त पितात त्यांना डास जास्त चावतात असा दावा करण्यात आलाय...होय, असं संशोधनात समोर आल्याचं सांगण्यात आलंय...हा दावा गंमतीशीर आहे, त्यामुळे खरंच डास दारू पिणाऱ्यांनाच जास्त चावतात का...? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...
...डास कुणाला जास्त चावतात हे पाहण्यासाठी 500 लोकांवर संशोधन करण्यात आले. नेदरलँड्समध्ये लोलँड्स फेस्टिव्हलमध्ये हे संशोधन करण्यात आलं...प्रत्येकानं आपले हात डासांनी भरलेल्या बॉक्समध्ये ठेवले. त्यावेळी ज्यांनी दारू प्यायली होती. त्यांना सर्वाधिक डास चावले...असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? दारू पिणाऱ्यांनाच का डास जास्त चावतात...? यामागचं काय कारण असू शकतं...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला...
त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...
नेदरलँड्समध्ये 500 जणांवर संशोधन करण्यात आले
सर्वाधिक डास दारू पिणाऱ्या व्यक्तींना चावले
शरीराच्या तापमानातील आणि वासातील बदल कारणीभूत
दारूमुळे नव्हे तर शरीरातील तापमानामुळे डास चावले
डास वेगवगळ्या कारणाने माणसाकडे आकर्षित होतात
डास दारू प्यायलेल्यांनाच चावतात हे कारण नाही...शरीराच्या तापमानातील आणि वासातील बदल कारणीभूत असतात, दारू प्यायल्यानंतर लोक अधिक उत्साही होतात...यामुळे शरीराचे तापमान वाढते. घामाचा वास बदलतो...डास या व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात...त्यामुळे आमच्या पडताळणीत दारू प्यायलेल्यांना डास जास्त चावतात हा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.