मुंबई : इंटरनेटच्या युगात, मेंदूचा व्यायाम करण्यासाठी लोक अनेकदा विविध मार्ग शोधतात. यामध्ये कोडी सोडवण्याचं काम अनेकजण करतात. पण गेल्या काही दिवसांत यात बदल झाला असून नेटिझन्सची आवड बदलली आहे. आता तो ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित चित्रे सोडवण्यात खूप रस दाखवत आहे.
सोशल मीडियावर दररोज असे खास फोटो डोळ्यांसमोर येतात ज्यात लोक काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी चित्रांमध्ये लपलेले विशेष रहस्य सहजपणे शोधले जाते तर कधीकधी ते खूप कठीण बनते.
असाच एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. चित्र गायींच्या कळपाशी संबंधित आहे. ज्यामध्ये जवळपास 100 गायी एकत्र उभ्या आहेत. गाईंमध्ये एक कुत्रा लपला आहे, त्याला शोधून दाखवाणं ही मजा आहे.
अनेकांना चित्रात लपलेला कुत्रा सापडलेला नाही. खुप कमी जणांना हा कुत्रा शोधण्यात यश आले आहे. तुमची एकाग्रता चांगली असेल तर तुम्ही प्रयत्न करा आणि 20 सेकंदात हे कोडं सोडवा.
गायींच्या कळपात लपलेला कुत्रा अजून सापडला नसेल तर हरकत नाही. चांगली गोष्ट म्हणजे कोडं सोडवण्याचा प्रयत्न केल्याने डोळ्यांना आणि मेंदूचा चांगला व्यायाम होतो. खरंतर वरपासून खालपर्यंत चौथ्या ओळीत कुत्रा अगदी डोळ्यासमोर उभा आहे. इल्युजनच्या कमालीमुळे हा कुत्रा समोर असूनही सहज आपल्याला दिसत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.