Sankashti Chaturthi 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

Sankashti Chaturthi 2024 : विकट संकष्ट चतुर्थी कधी? बुद्धीच्या देवतेला कसे कराल प्रसन्न, जाणून घ्या

Sankashti Chaturthi 2023 In April : संकष्ट चतुर्थी हा हिंदू धर्मातील महत्वाचा व्रत आहे. ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते. यंदा चैत्र महिन्यात येणारी चतुर्थी विकट संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल.

कोमल दामुद्रे

Sankashti Chaturthi Date :

प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. विनायक चतुर्थी आणि दुसरी संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थी हा हिंदू धर्मातील महत्वाचा व्रत आहे. ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते. यंदा चैत्र महिन्यात येणारी चतुर्थी विकट संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल.

या दिवशी उपवास केल्याने जीवनात शुभफले मिळतात. तसेच सर्व आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते. शुभ कार्यात यश मिळते. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीची (Sankashti Chaturthi) तिथी, पूजा आणि पद्धत

1. संकष्टी चतुर्थी तिथी

हिंदू पंचागानुसार चैत्र कृष्ण पक्षातील २७ एप्रिलला रोजी सकाळी ८.२० मिनिटांनी सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी २८ एप्रिल सकाळी ८.२० मिनिटांनी संपेल. २७ एप्रिल रोजी विकट संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येईल. या दिवशी चंद्रदर्शनाची वेळ रात्री १०.३० मिनिटांनी असेल.

2. शुभ मुहूर्त

गणेश पूजनासाठी शुभ मुहूर्त सकाळी ०७.२२ ते ०९.०१ पर्यंत आहे. या शुभ काळात तुम्ही गणपतीची पूजा करू शकता. पूजेच्या वेळी मोदक अर्पण करा. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद घ्या.

3. संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय

संकष्टी चतुर्थीला सर्वप्रथम आंघोळ करुन नवीन वस्त्र परिधान करावे. त्यानंतर गणेशाला सिंदूर लावून पूजा करावी. सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

तसेच श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला फुले, मोदक आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो.

धन (Money) प्राप्तीसाठी संकष्टी चतुर्थीला गणेश स्तोत्राचे पठण करावे. तसेच श्रीगणेशाला जास्वंदीचे फुल आणि दुर्वा अर्पण करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीत तरुणाची हत्या, मृतदेह विहिरीत फेकला

Conversions Bill: महाराष्ट्रात लागू होणार धर्मांतरण कायदा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी

Viral Video: आकाशात ३ हजार फुटावर घडली दुर्घटना, 2 पॅराग्लायडर एकमेकांवर आदळले; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा, VIDEO

गजनी, पैलवान ते हिस्ट्री सीटर गुन्हेगार; निलेश घायवळच्या दिली होती कानफटात, गुंड सागर मोहोळकरची कुंडली आली समोर

एमआयएमच्या १० नगरसेवकांचं पद जाणार? काय आहे कारण? VIDEO

SCROLL FOR NEXT