Monsoon Travel SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Travel : महाराष्ट्रातील 'ही' छुपी ठिकाणं स्वर्गापेक्षा कमी नाही, क्षणात होईल थकवा दूर

Lake In Maharashtra : सध्या महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस पडत आहे. अशात पर्यटकांची पावले आपोआप निसर्गाच्या दिशेला वळताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील या छुपी ठिकाणांना पावसात आवर्जून भेट द्या आणि मनसोक्त भिजा.

Shreya Maskar

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून निवांत वेळ काढायचा असल्यास महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणांना भेट द्या. आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत निसर्गाच्या सानिध्यात थोडा शांत वेळ घालवा. पावसाळ्यातील पिकनिक शरीराला ऊर्जा आणि आनंद देणारी गोष्ट आहे.

पावसाळ्यात महाराष्ट्रातील निसर्ग खुलून येतो. निसर्गाच्या कुशीत लपलेले अनेक निसर्गरम्य तलाव पाहायला पावसात महाराष्ट्राची सफर करा. डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळेल.

वेण्णा तलाव

वेण्णा तलाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. येथे पर्यटकांची पावसात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. निसर्गाचे अद्भुत सौंदर्य येथे अनुभवायला मिळेल. आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत सुट्या एन्जॉय करायला हे उत्तम ठिकाण आहे. वेण्णा तलाव महाराष्ट्रातील महाबळेश्वरला आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील बेस्ट हिल स्टेशन आहे. वेण्णा तलावाच्या आजूबाजूचा परिसर हिरवळीने व्यापला आहे. फोटोशूटसाठी हे उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात वेण्णा तलावाचे सौंदर्य आणखी खुलून येते.

अंबाझरी तलाव

नागपूर हे संत्र्या सोबतचअंबाझरी तलावासाठी देखील प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. नागपूरकरांसाठी पिकनिकचा हा हॉटस्पॉट आहे. नागपूरच्या दक्षिण-पश्चिम सीमेवर अंबाझरी तलाव वसलेले आहे. येथे निसर्गरम्य देखावे पाहायला मिळतात. नागपूर मधील नाग नदी या तलावातून उगम पावते. पावसाळ्यात येथील वातावरण स्वच्छ आणि सुंदर असते.

लोणार सरोवर

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर येते. येथील वातावरण मंत्रमुग्ध करणारे असते. फोटोशूटसाठी हे उत्तम ठिकाण आहे. सरोवराच्या आजूबाजूला उंच पर्वत आणि गवताळ प्रदेश पाहायला मिळेल. पावसात लोणार सरोवराचे सौंदर्य खुलून येते. पर्यटकांची येथे गर्दी पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ- नांदेड 'या' दोन जिल्ह्याचा संपर्क तुटला, पैनगंगा नदीला पूर

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

६-७-८-९ नाही, १० थरांचा विश्वविक्रम; जय जवान पथकाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारं कोकण नगर गोविंदा पथक नेमकं कुठलं?

SCROLL FOR NEXT