Velev Motors VEV 01 Saam Tv
लाईफस्टाईल

Cheapest Electric Scooters: एका चार्जमध्ये संपूर्ण मुंबई फिरता येईल, जबरदस्त आहे ही इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत फक्त 32500 रुपये

New EV Scooter: एका चार्जमध्ये संपूर्ण मुंबई फिरता येईल, जबरदस्त आहे ही इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत फक्त 32500 रुपये

Satish Kengar

Velev Motors VEV 01:

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. हेच लक्षात घेऊन अनेक नवीन वाहन उत्पादक आपली स्वस्त ईव्ही बाजारात आणत आहेत. यातच Velev Motors ने आपली VEV 01 ही एक दमदार ईव्ही स्कूटर सादर केली आहे.

या स्कूटरची किंमत फक्त 32500 रुपय आहे. सध्या ही एका प्रकारात आणि तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याला मोठे टायर आणि स्टायलिश लुक देण्यात आला आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

6 तासात होणार पूर्ण चार्ज

ही स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर 6 ते 8 तासांत पूर्ण चार्ज होते. याची टॉप स्पीड 25 किमी/तास आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ते 80 किमी पर्यंत रेंज देऊ शकत, असा दावा कंपनीने केला आहे. ही स्कूटर अतिशय आरामदायक सस्पेंशनसह येते. शहरातील गुळगुळीत रस्ते आणि खराब रस्ते या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन ही डिझाइन करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

15 Kwh बॅटरी पॅक

Velev Motors VEV 01 मध्ये 15 Kwh चा बॅटरी पॅक आहे, जो पॉवर देतो. या स्कूटरचे वजन एकूण 34 किलोग्रॅम आहे, ज्यामुळे अरुंद जागेतून चालणे आणि रस्त्यावर नियंत्रण करणे सोपे होते. घरातील कोणीही व्यक्ती ही स्कूटर चालवू शकतो. ही चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. यात आरामदायी सीट डिझाइन आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250 वॅटची मोटर आहे.

ही स्कूटर Ujaas Energy eGo शी स्पर्धा करते. Ujaas eGo LA एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 75 किमीपर्यंत रेंज देते. यात 1.56 Kwh चा बॅटरी पॅक आहे. यात 250 वॅटची मोटर आहे. ही स्कूटर 7 तासात फुल चार्ज होते. सुरक्षेसाठी समोर आणि मागील दोन्ही बाजूंनी ड्रम ब्रेक आहेत. यात ट्यूबलेस टायर आणि अधिक स्टायलिश लूक आहे.

Ujaas eGo LA ची किंमत 34880 हजार रुपये आहे. याचे टॉप मॉडेल 39,880 रुपयांना मिळते. ही स्कूटर सध्या फक्त दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. यात LA 48V आणि LA 60V लिथियम बॅटरी आहेत. ही स्मार्ट स्कूटर सर्व अत्याधुनिक फीचर्ससह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT