Vastu Tips For Living Room Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : लिव्हिंग रुम बनवताना या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा येईल मोठं आर्थिक संकट

Vastu Tips For Living Room : घर बांधताना वास्तूला विशेष महत्त्व दिले जाते. त्यानुसार घराचे सर्व भाग बनवले जातात. घरातील मुख्य भाग म्हणजे लिव्हिंग रुम. घरात प्रवेश करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे दिवाणखाना.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

घर बांधताना वास्तूला विशेष महत्त्व दिले जाते. त्यानुसार घराचे सर्व भाग बनवले जातात. घरातील मुख्य भाग म्हणजे लिव्हिंग रुम. घरात प्रवेश करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे दिवाणखाना.

घर बांधताना बरेचदा अनेकजण वास्तू लक्षात ठेवत असले तरी लिव्हिंग रुमचा अनेकांना विसर पडतो. वास्तू तज्ज्ञांच्या मते, घर बांधल्यानंतर दिवाणखाना वास्तूनुसार सजवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. निष्काळजीपणा केल्यास घरात (Home) वाद निर्माण होतात आणि नकारात्मकता सहन करावी लागते. जाणून घेऊया लिव्हिंग रुम बांधताना काय काळजी घ्यायला हवी.

  • वास्तू तज्ज्ञांच्या (Vastu Tips) मते, लिव्हिंग रुम बांधताना जास्तीत जास्त खिडक्या असाव्यात. यामुळे घरात सकारात्मकता येते. घर (Room) बांधताना या गोष्टींची काळजी घ्या.

  • वास्तूनुसार लिव्हिंग रुम ही इतर रुम सारखी नसावी. लिव्हिंग रुम ही सर्वात मोठी असावी. तसेच या ठिकाणी रडणारे, दु:खी किंवा भांडणाशी संबंधित कोणतेही चित्र लावू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

  • लिव्हिंग रुममध्ये लाईटीची कोणतीही उपकरणे आग्नेय दिशेला ठेवावी. तसेच या दिशेला रॅक आणि कपाट बनवू शकता. तसेच दक्षिण दिशेला टीव्ही लावावा.

  • लिव्हिंग रुममध्ये टेबल, खुर्ची यांसारखे फर्निचर लावा. यासाठी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते.

  • नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर ठेवण्यासाठी रोज संध्याकाळी मातीचा दिवा लावावा. तुम्ही पूजेच्या किंवा ध्यानाच्या ठिकाणी ठेवू नका.

  • लिव्हिंग रुममध्ये फुलांचे रोपटे लावू शकता. भिंतीचा आणि छताचा रंग वेगळा ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT