Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : घरात सतत नकारात्मकता जाणवते? भांडणं होतायत? या वास्तू टिप्स फॉलो करा, कधी भासणार नाही पैशांची चणचण

Vastu Tips For Negativity : वास्तूशास्त्रानुसार घरातील दिशा ही अधिक महत्त्वाची असते. ज्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर अधिक परिणाम होतो. अनेकदा घरात नकारात्मकता ऊर्जा वाढल्याने नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

बरेचदा घरात नकारात्मकता जाणवते, आपापसात वाद देखील होत राहातात. परंतु, प्रत्येक जण घरात शांततेची अपेक्षा करत असतात. घरातील प्रत्येक गोष्टी ही तिथे राहाणाऱ्या व्यक्तीवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करत असते.

वास्तूशास्त्रानुसार घरातील दिशा ही अधिक महत्त्वाची असते. ज्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर अधिक परिणाम होतो. अनेकदा घरात नकारात्मकता ऊर्जा वाढल्याने नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे घरातील सुख आणि शांती नष्ट होते. तसेच आर्थिक समस्या देखील सतावते. वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टींची काळजी (Care) घेतल्यास नकारत्मकतेपासून दूर राहाता येते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घर (Home) स्वच्छ ठेवा. घरात असलेली घाण नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच बरोबर अनावश्यक वस्तू गोळा करु नका.

दररोज संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावा. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. असे मानले जाते की, संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते.

घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचे तोरण बनवा आणि प्रवेशद्वारावर ठेवा. त्यामध्ये वापरलेली पाने हिरवी असावी.

जर तुमच्या घरात दररोज तणावाचे वातावरण निर्माण होत असेल तर त्यामागे नकारात्मक ऊर्जा असू शकते. त्यामुळे पाण्यामध्ये मीठ मिसळून पुसल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

सूर्याला रोज पाणी (Water) दिल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होऊ शकतो. सूर्य हा ग्रह मान आणि पदाशी संबंधित मानला जातो.

दररोज तुळशीलास अर्घ्य अर्पण करा. सकाळ संध्याकाळ त्याच्यासमोर तुपाचा दिवा लावा. तसेच शुक्रवारी व्रत पाळणे आणि लक्ष्मी सुक्तमचे पठण केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT